Market Committee Election
Market Committee Election  Agrowon
ताज्या बातम्या

Market Committee Election : सहा बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : जिल्ह्यातील कुर्डुवाडी, अकलूज, दुधनी, अक्कलकोट, सांगोला आणि मोहोळ बाजार समित्यांच्या (Market Committee) संचालक मंडळांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे.

सध्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर आता हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. मतदार यादीवरील हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर ७ डिसेंबरला या बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. साधारणतः डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूका आताच झाल्या आहेत. त्यानंतर आता बाजार समित्यांच्या निवडणुकांची रंगत रंगणार आहे.

जुन्या पद्धतीनेच मतदान
राज्य सरकारने बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. परंतु पणन कायद्याच्या दुरुस्तीचे हे विधेयक वेळेत विधिमंडळात येऊ शकत नसल्याने या सहा बाजार समित्यांसाठी जुन्या पद्धतीने ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीच्या सदस्यांतून मतदान होणार आहे, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT