Bhor Election | Bhor (Maharashtra) Assembly Election Results 2022 Agrowon
ताज्या बातम्या

Bhor Election : भोर खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

आमदार थोपटे गटाचे वर्चस्व कायम

Team Agrowon

भोर, जि. पुणे ः भोर तालुका (Bhor) खरेदी-विक्री संघाची निवडणूक (Election) बिनविरोध झाली असून, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. भोर तालुका खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी ६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यानंतर सर्व जागा बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी जाहीर केले.

निवडणुकीसाठी २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. निवडणूक प्रक्रियेत संजय पवार व सचिव विलास बुदगुडे यांनी काम पाहिले. काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली भोर तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली. आजपर्यंत खरेदी-विक्री संघावर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे.

बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढील प्रमाणे ः अतुल वसंत किंद्रे (बालवडी), विजय हनुमंत शिरवले (शिरवली हिमा.), संपत गणपत दरेकर (धावडी), विठ्ठल बाबूराव खोपडे (पोम्बडी), बबन तात्याबा जाधव (जांभळी), किशोर वसंत बांदल (आळंदे), बबन गोविंद गिरे (कर्नावड), नथू रामभाऊ साळेकर (वडतुंबी), दत्तात्रेय अशोक बाठे (कापूरहोळ), वसंत साहेबराव वरखडे (कंरदी बु.), नरेश रमेश चव्हाण (वेनवडी), सोमनाथ हिरालाल सोमाणी (शिंदेवाडी), सुजाता सुनील जेधे (आंबवडे), नंदा नामदेव मोरे (केंजळ), अतुल गणपत शेडगे (शिंद), दत्तात्रेय चंद्रकांत कांबळे (राजें), ज्ञानेश्‍वर बाळू भोसले (सांगवी).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे

Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार

Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ

Rabi Crop Management: शाश्‍वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण

SCROLL FOR NEXT