
नगर : नगर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक (Election) बिनविरोध झाली आहे. ग्रामसेवक (Gram sevak) युनियनचे माजी राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली. पतसंस्थेवर अनेक वर्षांपासून एकनाथ ढाकणे यांचे वर्चस्व आहे.
ग्रामसेवक पतसंस्थेने सुवर्णमहोत्सव साजरा केला आहे. ३० लाख रुपयांचे कर्ज देणारी महाराष्ट्रातील पगारदार नोकरांच्या पतसंस्थेत महाराष्ट्रातील अग्रणी संस्था म्हणून ग्रामसेवक पतसंस्थेला ओळखले जाते. सभासदांना १५ टक्के लाभांश, ऑडिट ‘अ’ वर्ग, स्वमालकीची इमारत, ऑनलाइन सेवा, अपघात विमा संरक्षण, मयत सभासदांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाते. विविध आर्थिक सेवा, सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेची वार्षिक उलाढाल ३५ कोटी असून संस्थेकडे आजमितीस २१ कोटींच्या ठेवी आहेत. सभासदांना ठेवींवर १० टक्के व्याज दिले जाते.
नुतन संचालक म्हणून एकनाथराव ढाकणे (अकोले), सुनिल नागरे (संगमनेर), गोरक्षनाथ शेळके (कोपरगांव), रुबाब पटेल (श्रीरामपूर) , किसन भिंगारदे (राहुरी), मंगेश पुंड (नगर), संदीप लगड (श्रीगोंदा), रामदास गोरे (जामखेड), दिलीप नागरगोजे (पाथर्डी), उद्धव जाधोर (शेवगाव), सुनिल वाघ (पारनेर), बबन सांगळे (राहाता),
सतीश मोटे (नेवासा), शाम भोसले (कर्जत), मुंढे वाळीबा चिंधू (अनु. जाती/जमाती मतदारसंघ), राणी फाटके-वाघ (महिला मतदार संघ), सविता वीर (महिला मतदार संघ), भगवान खेडकर (भट विमुक्त जाती मतदारसंघ), बाळासाहेब आंबरे (इतर मागास प्रवर्ग) यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अल्ताफ शेख यांनी, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नफीसखान पठाण यांनी काम पाहिले.
नगरची ग्रामसेवक पतसंस्था राज्यासाठी आदर्श आहे. सभासदांच्या हिताचा कायम निर्णय घेतल्याने यंदाही निवडणूकीत सभासदांनी विश्वास टाकतसंचालक मंडळ बिनविरोध निवडले. ग्रामसेवकांच्या हितासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे.
- एकनाथ ढाकणे, संचालक, ग्रामसेवक संघटना.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.