Fuel Price News in Marathi, Petrol Price News today, Petrol Price drop Agrowon
ताज्या बातम्या

Fuel Price: राज्यात पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

देशात मागील काही दिवसांत पेट्रोल (Petrol)आणि डिझेलचे (Diesel) दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती.

Team Agrowon

(वृत्तसंस्था)

वाढत्या महागाई त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मोठा दिलासा दिला. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इंधनाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते.

देशात मागील काही दिवसांत पेट्रोल (Petrol)आणि डिझेलचे (Diesel) दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यानंतर केंद्र सरकारने दर कमी केले होते. तसेच देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. त्यानुसार पेट्रोलच्या दरात पाच रुपये तर डिझेलच्या दरात तीन रुपयांनी कपात करण्यात आली आहे.(Fuel Price News today)

शिंदे सरकारकडून महाराष्ट्राला हे पहिले गिफ्ट देण्यात आले. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ४ नोव्हेंबर व २२ मे रोजी करात कपात केली होती. त्यांनी राज्य सरकारलाही कर कमी करण्याचे आवाहन केलं होतं. परंतु काही राज्यांनी सुचना मान्य करून कर कमी केला होता. महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) कर कमी केला नव्हता.

आता युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आज पेट्रोलवर (Petrol) प्रतिलिटर पाच रुपये व डिझेलवर तीन रुपये दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सहा हजार कोटी रुपयांचा भार शासनावर भार पडणार आहे. जनतेला यातून दिलासा मिळेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय पुन्हा बदलणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. यापैकी महाराष्ट्रातील सरपंचांची आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारने जनतेतून सरपंचांच्या आणि नगराध्यक्षांच्या निवडीचा निर्णय बदलला होता. या व्यतिरिक्त बाजार समितीच्या (APMC) निवडणुकीत शेतकऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT