Eknath Shinde agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हार्वेस्टर चालवण्याचा मोह अनावर

Eknath Shinde Driving Harvester : कन्नड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीक काढणीसाठी वापरण्यात येणारा हार्वेस्टर चालवला.

Team Agrowon

Eknath Shinde driving tractor : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ट्रक्टरचे स्टेअरिंग हाती घेण्याचा मोह पुन्हा एकदा आवरता आला नाही. यावेळी त्यांनी पीक काढणीसाठी वापरण्यात येणारा हार्वेस्टर आणि ट्रक्टर चालवला. यामुळे उपस्थित अवाक् झाले.

एकनाथ शिंदे हे नेहमीच अशा अनेक गोष्टीमुळे चर्चेत असतात. कधी ते आपल्या शेतात फेरफटका मारतात तर कधी लोकांमध्ये मिसळणे, त्यांची बोली बोलणे ही शिंदे यांची खासियत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. त्यांचे शेतात काम करतानाचे फोटो यापुर्वी अनेकदा समोर आले आहेत. स्ट्राॅबेरीची शेती, ट्रॅ्क्टर, फार्म हाऊस असे अनेक गोष्टीमुळे शिंदे नेहमी चर्चेत असतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यातील शेती आणि शेतकरी हा जिव्हाळ्याचा विषय आहे, याचा प्रत्यय आज कन्नड येथील कार्यक्रमात उपस्थितांना आला. लाभार्थ्यांसाठी ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टर वाटपाच्या वेळी शेतकऱ्यांना चाव्या सुपुर्द करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्रॅक्टर आणि कम्बाईड हार्वेस्टर स्वतः चालवून पाहिले. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडही त्यांच्यासोबत होते.

कार्यकर्त्यालाही आपल्या नेत्याने ट्रॅक्टर चालवल्याचा आनंद झाला. पण शिंदेंच्या या ट्रॅक्टर चालवण्याच्या हौसेमुळे त्यांच्यासाठी बंदोबस्तात असलेल्या यंत्रणेची मात्र चांगलीच धावपळ उडाली. शिंदे यांचे हे ट्रॅक्टर प्रेम पाहण्यासाठी कन्नडच्या रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

Cold Wave: लातुरात वाढला थंडीचा कडाका; तापमान ११ अंशावर

Farmers Crisis: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

PMFME Scheme: ‘पीएमएफएमई’ योजनेत अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पुढे या

Gopinath Munde Farmer Accident Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना पूर्णपणे डिजिटल; महाडीबीटीवरून थेट मदत मिळणार

SCROLL FOR NEXT