Eknath Shinde : ‘शासन आपल्या दारी’ अभियान अधिक व्यापक करणार ः मुख्यमंत्री

Government Scheme नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेक जण योजनांच्या लाभापासून वंचित राहतात.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

Satara News : ‘‘शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या वेळी दिली.

दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी देसाई विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ‘‘नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात जावे लागते. त्यामुळे अनेक जण योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. या योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासठी ‘शासन आपल्या दारी’ अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.

Eknath Shinde
Agriculture News : आर्थिकदृष्ट्या झेपेल तोच उद्योग उभारावा

मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा लाभ देण्यात येत आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. अल्पावधीत २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.’’

‘नमो शेतकरी’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये देण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली. सामान्य माणसालाही मुख्यमंत्र्याला भेटावेसे वाटते हा विश्‍वास शासनाविषयी निर्माण झाला आहे.

सातारा जिल्ह्यासाठी २ हजार ४५ कोटींचा निधी विकासकामांसाठी शासनाने दिला आहे, असे त्यांनी सांगितले. डोंगरी विकासाच्या २०० कोटींच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Eknath Shinde
Agriculture Irrigation News : पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘‘अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजना जनतेला समजावून सांगाव्यात आणि त्यांचा लाभ त्यांना द्यावा या हेतूने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.’’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

आमदार शहाजी पाटील यांनी देखील या वेळी विचार व्यक्त केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील २५ हजार ६९९ पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. कार्यक्रमाला आमदार शिवेंद्रराजे भोसले, महेश शिंदे, शहाजी पाटील, अनिल बाबर, प्रकाश आबीटकर, माजी आमदार नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com