Sugar Factory
Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Factory : ‘तनपुरे’ कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न

Team Agrowon

Nagar Sugar Factory : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या (Dr. Baburao Bapuji Tanpure Cooperative Sugar Factory) मालमत्तेचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

बंद कारखाना सुरू व्हावा, यादृष्टीने प्रयत्न राहील, असे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात मंगळवारी (ता. ३१) तनपुरे साखर कारखाना बचाव कृती समितीच्या प्रतिनिधींशी बँकेचे उपाध्यक्ष ॲड. कानवडे बोलत होते.

बँकेच्या संचालकांसह बचाव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तनपुरे कारखान्याला ४४ कोटींचे कर्ज मंजूर केले. त्या वेळी बँकेने थकबाकी वजा जाता प्रत्यक्षात सतरा कोटी रुपये कारखान्याला दिले.

त्यानंतर कारखान्याला एक रुपयाही नव्याने कर्जपुरवठा केला नाही. याच कर्जाचे सहा वर्षांपूर्वी बँकेने पुनर्गठण केले. कारखान्याने वेळोवेळी ५० कोटींवर कर्जफेड केली आहे, तरी थकबाकी ११० कोटींवर पोहोचली आहे. बँकेच्या स्थापनेनंतर कर्ज घेणारा हा पहिला साखर कारखाना आहे.

बँकेला कोट्यवधींचा परतावा दिला आहे, तरी कारखाना जप्त केला. बँकेतर्फे कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेऊ नये. त्यास सभासदांचा विरोध आहे.

कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपली आहे. लवकरच निवडणूक प्रक्रिया होईल. नवीन संचालक मंडळाला कारखाना सुरू करण्यासाठी बँकेतर्फे सहकार्य व्हावे.

केंद्र सरकारच्या एसडीएफ निधीतून बँकेची थकबाकी मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा बचाव समितीकडून व्यक्त केली. त्यावर की कारखान्याची निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत भाडेतत्त्वावर कारखाना देण्याचा निर्णय होण्याची शक्यता नाही.

केंद्राच्या एसडीएफ फंडातून मदत मिळाल्यास कारखाना आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर येईल असे कानवडे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT