Pest Management  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Drone : ड्रोनद्वारे फवारणी केल्यास प्रभावी कीड व्यवस्थापन शक्य ः कुलगुरू डॉ. मणी

ड्रोनद्वारे फवारणी केल्‍यास कीटकनाशकांच्या कमी मात्रेत प्रभावी कीड व्‍यवस्‍थापन शक्‍य होईल.

Team Agrowon

परभणी ः ड्रोन द्वारे फवारणी (Drone Spraying) केल्‍यास कीटकनाशकांच्या (Pesticide) कमी मात्रेत प्रभावी कीड व्‍यवस्‍थापन (Pest Managment) शक्‍य होईल. सायनिक कीटकनाशकांचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी विविध पिकांवर फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये शनिवारी (ता. १९) हरियाना मधील गुरुग्राम येथील कीटकनाशक सूत्रीकरण तंत्रज्ञान संस्थेतर्फे आयोजित पीक उत्‍पादनात कीटकनाशकांचा सुरक्षित न्‍याय वापर आणि नव्या पिढीतील सूत्रांचा उपयोग यावरील कार्यशाळेच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

कीटकनाशक सुत्रीकरण तंत्रज्ञान संस्‍थेचे संचालक डॉ. जितेंद्र कुमार, जिल्‍हाधिकारी आंचल गोयल, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. एन. ए. शकील, निर्माण तज्ज्ञ डॉ. अमरीश अग्रवाल, शास्‍त्रज्ञ सुदीप मिश्रा, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ. पी.एस. नेहरकर, आदींची उपस्थिती होती.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की जिल्हाधिकारी गोयल यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून सहाशे युवकांना विविध कृषी तंत्रज्ञान विषयक कौशल्‍य विकास विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. गोयल म्‍हणाल्‍या, की मातीचे आरोग्य अबाधित राखण्यासह पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी रासायनिक निविष्ठांच्या योग्य वापरासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवावी लागेल.

तांत्रिक सत्रात नवीन कीटकनाशक घटकांचा वापरावर डॉ. अग्रवाल यांनी, कीटकनाशकांचा सुरक्षित न्‍यायिक वापर यावर सुदीप मिश्रा, शेतीतील चांगल्‍या कृती यावर डॉ. जी. पी. जगताप, किट व्‍यवस्‍थापनातील मूलभूत तत्त्वे यावर डॉ. अनंत लाड, सेंद्रिय शेतीवर डॉ. आनंद गोरे यांनी माहिती दिली. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना फवारणी सुरक्षा किटचे वाटप करण्‍यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT