Millet Crop Agrowon
ताज्या बातम्या

Millet Awareness : शिक्षण विभाग सांगणार तृणधान्याचे महत्त्व

Millet Year 2023 : केंद्र सरकारने २०२३ हे वर्ष जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Nashik News : केंद्र सरकारने २०२३ हे वर्ष जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने मिलेट महोत्सव भरविला जाईल. यापुढे जात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पौष्टिक तृणधान्याविषयी जागृती करण्याची जबाबदारी शिक्षण विभागावर टाकली आहे. त्यासाठी १ ऑगस्टपासून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक यांना पत्र काढले आहे. पौष्टिक तृणधान्य जागृतीसाठी तालुका तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना विविध उपक्रम राबविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

१ ते १४ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील शाळांत तृणधान्यांबद्दल कृषी सहायकांमार्फत माहिती देण्यात येईल. त्यात शाळांमध्ये पालक, नागरिक यांचाही समावेश असणार आहे. तसेच १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत पोषण पंधरवडा साजरा केला जाईल.

पंधरवड्यात पालक, नागरिक तसेच स्वयंपाकी, मदतनीस यांच्या मदतीने पाककृती स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून एक पाककृती तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पाठवली जाईल.

तालुकास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या पाककृतींना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे पाच हजार, साडेतीन हजार व अडीच हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. जिल्ह्यात १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत निबंध व वक्तृत्व स्पर्धा होतील.

उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. या उपक्रमांसाठी लागणारा निधी पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण या योजनेतून मिळेल. यामुळे भरड धान्याविषयी जागृती करण्यासाठी शिक्षण विभागही सरसावला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: जमीन सुपीकता, काटेकोर खत व्यवस्थापनावर भर

Ladaki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून ६,८०० कोटींची वसुली होणार; योजनेत ४२ लाख अपात्र लाभार्थी 

Star Campus Award: ‘अर्थ डे नेटवर्क’तर्फे मुक्त विद्यापीठास ‘स्टार कॅम्पस अॅवॉर्ड’ 

Onion Farmers: कांद्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करा

Sugarcane Crushing Season: आगामी गाळपासाठी एक लाखावर हेक्टर ऊस

SCROLL FOR NEXT