Millet Awareness : तृणधान्याविषयी जागृतीसाठी शिक्षण विभाग सरसावला

Millet Year : पौष्टिक तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी आता राज्याच्या शिक्षण विभागावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
Millet Crop
Millet CropAgrowon
Published on
Updated on

Pune News : पौष्टिक तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी आता राज्याच्या शिक्षण विभागावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. एक ऑगस्टपासून ते १५ ऑक्टोबरपर्यंत राज्यभर विविध उपक्रम घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, पौष्टिक तृणधान्याविषयी जागृती केली तरच वापर वाढेल व त्यानंतरच उत्पादनाला मागणी येईल. परंतु त्यासाठी अत्यावश्यक असलेल्या जनजागृती उपक्रमांकरिता एकटा कृषी विभाग अपुरा आहे.

शिक्षण, आरोग्य, महसूल विभागांच्या यंत्रणेची मदत घेतली तर उपक्रम वाढू शकतील. तूर्त यापैकी राज्य शासनाने शिक्षण विभागाकडे काही विषयांची जबाबदारी सोपविली आहे.

Millet Crop
Millets Benefits : मुलांना थकवा जाणवतोय? जंकफूड नव्हे तर आहारात करा या पदार्थांचा समावेश

शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इ. मु. काझी यांनी जारी केलेल्या एका आदेशानुसार, आता पौष्टिक तृणधान्य जागृतीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना विविध उपक्रम राबविणे बंधनकारक असेल.

एक ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान सर्व शाळांमध्ये पौष्टिक तृणधान्ये कोणती व त्यांचे आहारातील महत्त्व काय याची माहिती शालेय विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी गट शिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहाराचे कामकाज सांभाळणाऱ्या अधीक्षकाने कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे.

एक सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान राज्यभर पोषण पंधरवडा साजरा होईल. त्यात शाळांमध्ये पालक, नागरिक, स्वयंपाकी, मदतनीस यांच्या मदतीने पाककृती स्पर्धा होतील. या स्पर्धांमधून एक पाककृती तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पाठवली जाईल. तालुकास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या पाककृतींना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे पाच हजार, साडेतीन हजार व अडीच हजाराचे बक्षीस दिले जाणार आहे.

Millet Crop
Millet Procurement: सरकार भरडधान्याची २६ लाख टन खरेदी करून वितरण करणार

राज्यात एक ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान निबंध व वक्तृत्व स्पर्धा होतील. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. या उपक्रमांसाठी लागणारा निधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून मिळणार आहे.

१५ ऑगस्टच्या प्रभात फेऱ्यांमध्ये तृणधान्याचा विषयी जनजागृती

पौष्टिक तृणधान्याविषयी जागृती करण्यासाठी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी गावोगावी निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांमध्ये तृणधान्य जागृती हा मुख्य विषय असावा, असे शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com