Agriculture Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : शाश्‍वत विकासामुळेच निढळला आर्थिक सुबत्ता : नाना पाटेकर

Team Agrowon

Satara News : ‘‘पाणी असेल तरच गावचा विकास साधता येतो, हे निढळकरांनी जाणले. एकजुटीच्या बळावर अशक्य असणारे काम गावाने शक्य करून दाखविले. म्हणूनच दुष्काळी भागातील निढळमध्ये आज आर्थिक सुबत्ता आली आहे.

त्यासोबतच प्रत्येक कुटुंबाचे राहणीमान उंचावले आहे. याचे सर्व श्रेय निढळचे सुपुत्र व पुणे विभागाचे माजी आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या कामातील सातत्याला जाते,’’ असे मत सिनेअभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी व्यक्त केले.

आदर्श गाव निढळच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते. या वेळी पुणे विभागाचे माजी विभागीय आयुक्त व रयत विद्यापीठ कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, मल्हार पाटेकर, माजी सरपंच श्रीमंत निर्मळ, अशोक यादव, प्रशांत घाडगे आदींसह ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते.

नाना पाटेकर म्हणाले, की श्री. दळवी यांनी १९८३ पासून गावात जलसंधारण, नळपाणी पुरवठा योजना, शिक्षण, आरोग्य, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम, तंटामुक्ती, महिलांचे आर्थिक सबलीकरण, वृक्षारोपण यासह विविध विकासाच्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या. या कामांमुळेच गावचे नाव देशाच्या नकाशावर कोरले गेले. निढळमध्ये शाश्‍वत विकासकामे झाल्यामुळे गावातील शेतकरी शेतीतून चांगले उत्पन्न घेऊ लागले आहेत.

गोरगरीब जनतेला गावातच रोजगार मिळू लागला आहे. नोकरीनिमित्त शहराकडे जाणारा ओघ थांबला आहे. गावातील विद्यार्थ्यांना शहराप्रमाणे अद्ययावत शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत.

विशेष म्हणजे महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योजक उभारून महिलांची आर्थिक उन्नती साधली आहे. युवकांसाठी जिम, गावातील ग्रामस्थ व महिलांसाठी अद्ययावत असे नाना-नानी पार्क उभारले आहे.

पाटेकर म्हणाले, की निढळमधील प्रत्येक माणूस गावच्या विकासाबाबत जागरूक आहे. त्यामुळेच गावात शहरापेक्षा नीटनेटकेपणा अनुभवास मिळत आहे. आपापसांतील मतभेदांमुळे गावे दिशाहीन होताना दिसत आहेत; परंतु निढळ गाव गेली ४० वर्षे अखंडितपणे काम करीत आहे.

श्री. दळवी यांच्यासारखे दिशादर्शक नेतृत्व, कामातील पारदर्शकता व ग्रामस्थांचा सहभाग यामुळे हे गाव आदर्श घडू शकले. निढळ गावाच्या विकासाची केवळ चर्चा न करता प्रत्येक गावाने त्याचे अनुकरण करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT