Mango Cashew Agrowon
ताज्या बातम्या

E Peek Pahani : आंबा, काजूसह फळझाडांची ई-पीकपाहणी पाच वर्षांनी करा

Mango Cashew Crop : हवामानावर आधारित पीकविमा, शासनाकडून दिली जाणारी नुकसानभरपाई यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीकपाहणी नोंदणीची आवश्यकता असते.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही मोबाइल रेंजची सोय उपलब्ध नाही. त्यातच आंबा, काजूची दरवर्षी ई-पीकपाहणी नोंदणी करण्यास सांगितले जात आहे. मात्र ही सर्व प्रकिया पूर्ण करताना आंबा, काजू बागायतदार मेटाकुटीला येत आहेत.

त्यामुळे आंबा, काजूसह फळझाडांची ई-पीकपाहणी पाच वर्षांनी करण्यात यावी, अशी मागणी कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. हवामानावर आधारित पीकविमा, शासनाकडून दिली जाणारी नुकसानभरपाई यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीकपाहणी नोंदणीची आवश्यकता असते.

मात्र आंबा, काजू लागवड केल्यानंतर फार मोठे बदल तीन-चार वर्षांत होत नाहीत. त्यामुळे आंबा, काजू आणि जिल्ह्यात महत्त्वाची फळपिकांची दरवर्षी ई-पीकपाहणी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

एकीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रेंजची उपलब्धता नाही आणि दुसरीकडे ऑनलाइन ई-पीकपाहणी करण्यास सांगणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करीत कणकवली तालुक्यातील आंबा, काजू बागायतदारांनी तहसीलदारांकडे पाच वर्षांनीच आंबा, काजू ई-पीकपाहणी नोंदणी करावी, अशी मागणी केली आहे. तशा प्रकारचे लेखी निवेदन तहसीलदार दीक्षान्त देशपांडे यांच्याकडे देण्यात आले आहे.

भातपीक नोंदणी दरवर्षी करणे आवश्यक आहे. परंतु आंबा, काजूची दरवर्षी ई-पीकपाहणी करण्याची अजिबात गरज नाही. त्यामुळे शासनाने पाच वर्षांनी आंबा, काजूची ई-पीकपाहणी नोंदणी करावी. शासनाने या निर्णयात बदल करावा.
- पप्पु ब्रह्मदंडे, सरपंच तथा शेतकरी, शेर्पे, ता. कणकवली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT