PM Kisan Agrowon
ताज्या बातम्या

PM Kisan : ७३ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अडकली

४० हजार शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक झालेले नाही. त्यामुळे जवळपास ४० हजार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

यवतमाळ : पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी (Pradhan Mantri Kisan Samman Yojana) ई-केवायसी (E-KYC) आवश्यक आहे. अजूनही ७३ हजार ३८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही.

शिवाय ४० हजार शेतकऱ्यांचे बँक खाते (Bank Account) आधारशी लिंक झालेले नाही. त्यामुळे जवळपास ४० हजार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान (PM Kisan) योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अनुदान केंद्र शासनाच्या माध्यमातून पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत सुरू करण्यात आले आहेत. तीन टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून सुरूवातीला मदत मिळाली होती. त्यानंतर केंद्र शासनाने आयकर भरणारे शेतकरी, नोकरदार यांना योजनेतून वगळले.

किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. आधार, बँक खाते लिंक असेल तर इ-केवायसी करणे बंधनकारक आहे.

मात्र, जिल्ह्यात ४० हजार ७०३ शेतकऱ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी अद्याप लिंक झालेले नाहीत. शिवाय ७३ हजार ३८१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही.

याशिवाय, ३० हजार शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती भूमी अभिलेख कार्यालयात आलेली नाही. परिणामी, मार्च महिन्यात येणाऱ्या हप्त्यातून अनेक शेतकरी वंचित राहण्याचा धोका आहे. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विभाग व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.

वेळेत त्रुटी दूर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनीही आपले आधार तसेच बँक खात्यांची ई-केवायसी करून घ्यावी. जेणेकरून, येणारी मदत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल.
ललितकुमार वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT