Solapur ZP  Agrowon
ताज्या बातम्या

Solapur ZP : मार्चअखेरमुळे जिल्हा परिषदेचे कामकाज शनिवारी, रविवारीही सुरु राहणार

जिल्हा परिषदेच्या प्रशासनापुढे २०२१-२२ मधील जवळपास ४८ कोटी रुपयांच्या निधी खर्चाचे आव्हान आहे.

Team Agrowon

Solapur News जुन्या पेन्शनसाठी (Old Pension Scheme) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर जिल्हा परिषदेत (Solapur ZP) प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आणि मार्चअखेर कामांचा वेग वाढावा, यासाठी जिल्हा परिषदचे कामकाज उद्या शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) सुटीच्यादिवशीही सुरुच राहणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रशासनापुढे २०२१-२२ मधील जवळपास ४८ कोटी रुपयांच्या निधी खर्चाचे आव्हान आहे. पण गेल्या आठवड्यात शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सात दिवसांचा बेमुदत संप केला होता.

त्यामुळे जिल्हा परिषदेचा निधी मार्चमहिन्यापूर्वी खर्च होण्याबाबत अडचणी आल्या होत्या. प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लागावीत, यासाठी आता सुटीच्यादिवशीही जिल्हा परिषदेचे कामकाज सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

यासाठी सर्व खातेप्रमुख, तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेला मिळालेला निधी पूर्णपणे खर्च व्हावा, या उद्देशाने सर्व विभागप्रमुखांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT