Nandurbar ZP : एकोणतीस कोटी शिलकीचे अंदाजपत्रक सादर

जिल्हा परिषदेचा २०२२-२०२३ या वर्षाचा सुधारित व २०२३-२०२४ या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. ३) झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत सादर करण्यात आला.
Nandurbar ZP
Nandurbar ZPAgrowon

Nandurbar ZP News : जिल्हा परिषदेचा २०२२-२०२३ या वर्षाचा सुधारित व २०२३-२०२४ या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प (Budget) शुक्रवारी (ता. ३) झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत सादर करण्यात आला.

त्यात महसुली व भांडवली अशा ७० कोटी ६६ लाख १७ हजार ७७९ रुपयांचा व २८ कोटी ९८ लाख २७ हजार ३७४ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक अर्थ समितीचे सभापती गणेश पराडके यांनी सभेत मांडले.

जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत झाली. उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदींसह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

Nandurbar ZP
Amravati ZP News : जिल्हा परिषद प्रशासनासमोर ६० दिवसांचे टार्गेट

या वेळी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर अर्थ समितीचे सभापती गणेश पराडके यांनी अंदाजपत्रक सादर केले. त्यात त्यांनी नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समित्यासह स्वउत्पन्नाचे जमा व खर्चाचे २०२२-२०२३ चे सुधारित अंदाजपत्रक व २०२३- २०२४ चे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आले.

Nandurbar ZP
Palghar ZP News : लेटलतिफ कर्मचाऱ्यांना ‘बायोमेट्रिक’चा चाप

जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात प्रामुख्याने शासनाकडून उपलब्ध होणारे अनुदान जसे स्थानिक उपकर, वाढीव उपकर, स्थानिक उपकर सापेक्ष अनुदान, मुद्रांक शुल्क इत्यादींचा समावेश होतो.

तो विचारात घेऊन तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची स्वउत्पन्नाची जमा रक्कम विचारात घेऊन ग्रामीण क्षेत्राच्या समतोल विकासाकरिता निधी उपलब्ध करून देणारे २०२३-२०२४ चे अंदाजपत्रक अर्थ समितीचे सभापती गणेश पराडके यांनी सभेत सादर केले.

जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकासोबत पंचायत समिती वाढीव उपकर अनुदान, घसारा निधी व ग्रामीण पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती निधी यांचेही जमा वखर्चाचे सुधारीत व मूळ अंदाजपत्रक सोबत सादर केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com