Wheat Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Wheat Sowing : थंडीमुळे गव्हाच्या पेरण्यांना सुरुवात

गेल्या काही दिवसांपासून थंडीस सुरुवात झाली आहे. यंदा उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना सुरू झाली आहे.

टीम अॅग्रोवन.

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून थंडीस (Cold Weather) सुरुवात झाली आहे. यंदा उशिराने पोषक हवामान (Favorable weather) तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना (Wheat Sowing) सुरू झाली आहे. आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी २२ हजार ५४१ म्हणजेच १३ टक्के पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा चांगल्या झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांचा आहे. गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगल्या असतो. मात्र उशिराने झालेल्या पावसामुळे वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या काही ठिकाणी गहू उगवून वर आला आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापूरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ हे तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखले जातात. विभागात अक्कलकोट तालुक्यात गव्हाची सर्वाधिक पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यातही बऱ्यापैकी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक सुमारे एक हजार ८८८ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल नगर, पाथर्डी, राहाता, जामखेड, शेवगाव, कोपरगाव या तालुक्यांत गव्हाची पेरणी झाली आहे. पारनेर, कर्जत, नेवासा, अकोले तालुक्यांत अजूनही पेरण्यांना सुरुवात झालेली नाही.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सर्वाधिक सुमारे एक हजार ३५० हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ बारामती, जुन्नर, खेड या तालुक्यांत पेरणीस सुरुवात झाली आहे. तर मुळशी, मावळ, वेल्हे तालुक्यांत अजूनही पेरणीस सुरुवात झालेली नाही.

सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक सुमारे ९ हजार ४२५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यानंतर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, माढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांत पेरणी झाली आहे.

पुणे विभागात झालेली गहू पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्केवारी

नगर ८६,४०५ ५७७९ ७

पुणे ३९,८०३ ३९३८ १०

सोलापूर ४२५८८ १२८२४ ३०

एकूण १,६८,७९६ २२,५४१ १

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Decision: शेतकरी कर्जमाफीवर सरकार लवकरच निर्णय घेणार; बावनकुळेंची माहिती

Fruit Market: गुणकारी आवळ्याला ग्राहकांची मागणी वाढली

Rabi Sowing: धुळे जिल्ह्यात २३ टक्क्यांवर रब्बी पेरणी

Agricultural Import Policy: आयात धोरण शेतकरी, ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने समतोल हवे- कृषिमंत्री चौहान

Rabi Crop Competition: रब्बी हंगाम स्पर्धेसाठी अर्ज करा

SCROLL FOR NEXT