soybean production  Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Production : कीड, रोगांच्या प्रादुर्भामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेत मोठी घट शक्य

Latest Agriculture News : परभणी हिंगोली जिल्ह्यात जुलै ऑगस्ट महिन्यातील पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पावसाचा दीर्घ खंडामुळे पिकाला पाण्याचा ताण बसला.

Team Agrowon

Parbhani News : परभणी हिंगोली जिल्ह्यात जुलै ऑगस्ट महिन्यातील पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पावसाचा दीर्घ खंडामुळे पिकाला पाण्याचा ताण बसला. त्यानंतर तापमानात वाढ झाली. आर्द्रता कमी झाली.

जमिनीतून कमी अन्नद्रव्ये पुरवठा यासह खोडमाशी, शेंगा पोखरणारी अळी आदी किडींचा प्रादुर्भाव यामुळे फुलोरा, शेंगा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन पिकांसाठी प्रतिकूल वातावरण आहे. यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादकतेत मोठी घट येणार आहे.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा पाच लाखांवर हेक्टरवर सोयाबीनचा पेरा आहे. पावसाचे आगमन लांबल्यामुळे पेरणीस उशिरा झाला. जून महिन्यातील कमी पाऊस आणि जुलै ऑगस्टमधील पिकाच्या संवेदनशील अवस्थेतील पावसाचा दीर्घ खंडामुळे जमिनीतील ओलावा नष्ट झाला. हलक्या बरड जमिनीवरील पिके करपून गेली. भारी जमिनीवरील पिके कशीबशी तग धरून होती. परंतु फुलोरा अवस्थेतून शेंगा भरण्याच्या अवस्थेत जात असताना पाण्याचा ताण बसला आहे.

अनेक भागांतील शेतकऱ्यांकडून सोयाबीन पिकाला शेंगा न लागल्याच्या तक्रारी येत आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व कृषी विभागाच्या पथकाने झरी (ता. परभणी) येथील सोयाबीनची पाहणी केली. त्यात कृषी कीटकशास्त्रज्ञ विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहकर, कीटकशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अनंत बडगुजर, कृषी अधिकारी लोहार आदींचा समावेश होता.

पावसाच्या खंडामुळे पिकास पाण्याचा ताण बसला व त्यानंतर तापमानातील बदल, कमी झालेली आर्द्रता, यामुळे सोयाबीनच्या शेंगांतील दाणे भरण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात जमिनीतून अन्नद्रव्याचा पुरवठा होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शेंगांतील दाण्याचा आकार छोटा आहे.

अनेक ठिकाणी खोडकीड, खोड माशी, शेंगा पोखरणारी अळी, (उंट अळी, लष्करी अळी) पाने खाणारी अळी अशा विविध किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेत मोठी घट अपेक्षित आहे, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.

पावसाच्या खंडामुळे जमिनीतील ओलावा कमी आहे. पिकास अन्नद्रव्यांचा पुरेसा पुरवठा होत नाही. सामान्यापेक्षा ३ ते ४ अंशांनी तापमान वाढले आहे. आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगांमधील दाण्याचा आकार बारीक आहे. लवकर पाऊस न झाल्यास सोयाबीनच्या उत्पादकतेत ५० टक्क्यांहून अधिक घट येऊ शकते.
- डॉ. एस. पी. म्हेत्रे, सोयाबीन पैदासकार, वनामकृवि, परभणी
परभणी तसेच अन्य जिल्ह्यांत सोयाबीनवर खोडमाशी, खोडकीड, शेंगा, पाने खाणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा उत्पादकतेवर परिणाम होणार आहे.
- डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, कीटकशास्त्रज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT