Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : जिवाचं बरं वाईट करण्याशिवाय पर्याय नाही

संकटातून आता तुम्हीच आम्हाला बाहेर काढा’ असे धायमोकलून रडत शेतकऱ्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासमोर व्यथा मांडली. ही व्यथा भारत जाधव या शेतकऱ्याने मांडली असली, तरी जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे.

दत्ता देशमुख

दत्ता देशमुख

बीड : ‘आमच्यावर आभाळच कोसळलंय..लई नुसकान झालंय..आता जिवाचं बरं वाईट केरण्याशिवाय पर्याय नाही, या संकटातून आता तुम्हीच आम्हाला बाहेर काढा’ असे धायमोकलून रडत शेतकऱ्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासमोर व्यथा मांडली. ही व्यथा भारत जाधव (Bharat Jadhav) या शेतकऱ्याने मांडली असली, तरी जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती आहे.

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून परतीचा जोरदार पाऊस पडत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने शेंगा भरणीला आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात आता परतीच्या अतिवृष्टीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. सततच्या पावसाने शेतांना तलावाचे रुप आले आहे. सोयाबीन शेतातच सडत असून कपाशीच्या फुटलेल्या बोंडाच्या वाती झाल्या असून आतूनच कोंब येत आहेत. आता शेतातील सोयाबीन बाहेर काढणीचा खर्चही उत्पन्नातून निघणे शक्य नाही. त्यात विमा कंपनीने अग्रिम देण्यास हात वर केले आहेत. त्यामुळे शेतकरी हाताश आहे.

दरम्यान, बुधवारी पंकजा मुंडे यांनी तालुक्यातील जाधववाडी येथे पाहणी दरम्यान शेतकऱ्याने आपल्या भावनांना आश्रुसह वाट मोकळी करून दिली. ‘अस काही करू नका, धीर धरा, सरकार नक्की मदत करेल, मी तुमच्या पाठीशी असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी रमेश आडसकर, राजेंद्र मस्के आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी,

महामार्गाच्या लगतच्या शेतात निकृष्ट नाली बांधकामामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे, यात दोषी कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली. पीक विम्याच्या बाबतीत जिल्ह्यावर अन्याय होत आहे, पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. विमा कंपनीला सरकारच्या आदेशाचे पालन करावेच लागेल असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, जिल्ह्यातील पावसामुळे पीक नुकसानीची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही पाहणी केली. त्यांनी बीडसह गेवराई, धारूर, माजलगाव तालुक्यांत नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, तहसीलदार सुहास हजारे, तहसीलदार सचिन खाडे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT