Heavy Rainfall Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पावसाचे द्राक्ष बागांवर ग्रहण

घड जिरण्याचे प्रमाण वाढले; डाऊनी, घडकुजीचा धोका

टीम ॲग्रोवन

सांगली : राज्यातील द्राक्ष उत्पादक (Grape Producers) शेतकऱ्यांनी फळछाटणी सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे ४० टक्क्यांपर्यंत फळछाटणी झाली आहे. फळछाटणी केलेल्या द्राक्ष बागांची पोंगा, विरळणी, फुलोरा, तर काही ठिकाणी डीपिंगची अवस्था आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी (Heavy Rainfall) लावली आहे.

या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे घड जिरणे, डाऊनी आणि करपा रोगाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. द्राक्ष बागांवर परतीच्या पावसाचे ग्रहण लागले असल्याने ऐन छाटणीत पडणारा पाऊस द्राक्ष बागांच्या जिवावर उठला आहे.

राज्यात द्राक्षाचे सर्वसाधारपणे चार ते पाच लाख एकर क्षेत्र आहे. वास्तविक पाहता, दरवर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात फळछाटणीस विलंब झाला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत फळ छाटणी घेतली आहे. सांगली विभागात सुमारे चाळीस टक्के, सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद या ठिकाणी १० टक्के पुणे विभागात ५० टक्के, तर नाशिक भागात ४० टक्के अशी एकूण चाळीस टक्क्यांपर्यंत फळ छाटणी झाली आहे.

फळ छाटणी केल्यानंतर वेलींवर घड चांगल्या दर्जाचे लागले. हंगामपूर्व आगाप फळछाटणी केलेल्या द्राक्ष बागांची पोंगा, विरळणी, फुलोरा, तर काही ठिकाणी डीपिंगची अवस्था आहे. काही ठिकाणी वांझ फूट काढण्याची कामे सुरू आहेत. मात्र पावसामुळे द्राक्ष हंगाम छाटणीपासून अडचणीत आला. डाऊनीचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी बागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भावही झाला असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे घड जिरण्याचा प्रकारही होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सटाणा परिसरात हंगामपूर्व द्राक्षाची काढणी सुरू आहे. आता पडणाऱ्या पावसामुळे या द्राक्षाचे नुकसान होण्यास प्रारंभ झाला आहे.

फळछाटणीला ब्रेक

सध्या पाऊस असल्याने बागेत पाणी साचले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फळछाटणीचे केलेले नियोजन कोलमडले आहे. सातत्याने वातावरण बदलत आहे. परिणामी फळछाटणीला ब्रेक लागला आहे.

राज्यातील द्राक्षावर परतीच्या पावसाचे संकट ओढावले आहे. या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.

- शिवाजी पवार, अध्यक्ष,

महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT