Nashik Agriculture News  Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Latest News : शेतीमालाचे दर कोसळल्याने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

Team Agrowon

Nashik Agriculture News : गेल्या काही महिन्यांपासून उन्हाळ कांद्यासह, भाजीपाला व अन्य शेतीमालाचे भाव कोसळल्याने द्याने (ता. सटाणा) येथील संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ पुढाऱ्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला असून त्याचे अनावरण शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी द्याने गावाने वज्रमूठ बांधली असून गावात आमदार, खासदार, मंत्री, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदी लोकप्रतिनिधींना गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय शेतकरी, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा मातीमोल भावाने बाजार समित्यांमध्ये विकला जात आहे. यामुळे शेतकरी जगणार कसा, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, उपाध्यक्ष सतीश कापणे, महेंद्र कापडणीस, दिलीप कापडणीस, अशोक कापडणीस, नानाजी कापडणीस दादा खैरनार आदी उपस्थित होते.

ऐन उन्हाळ्यात भाजीपाल्यास योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. मात्र मोठ्या आशेवर निवडून दिलेले लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याऐवजी मूग गिळून गप्प बसले आहेत.

सध्या परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. तसेच इतर शेतीमालाला भाव नाही. भारताची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या हातात असून, शेतकऱ्यांची आज जी दैना झालेली आहे. त्यास कुणी वाली नसल्याची तीव्र भावना शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाली आहे.

..तर कांदे फेकून स्वागत करणार

निराश व संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुढारी व लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी गावाच्या प्रवेशद्वारासह गावात ठिकठिकाणी फलक लावले. लोकप्रतिनिधींनी गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास कांदे फेकून स्वागत करणार असल्याचा इशाराही शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी दिला.

घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. फेब्रुवारी, मार्चमध्ये लूट भावाने विक्री झालेल्या कांद्याचे अनुदान वाटपाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. राज्यातील सर्व गावकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करून निष्क्रिय ठरलेले राजकीय पुढारी, प्रतिनिधी यांना व शासनाला जाब विचारला पाहिजे. पुढाऱ्यांचे कांदे मारून स्वागत केले जाईल.
- ललित बहाळे, प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT