Rain Update  Agrowon
ताज्या बातम्या

Rain Deficit : पावसाळा ‘कोरडा’

Drought Condition : पावसाळ्याचा साडेतीन महिन्यांचा कालावधी संपला आहे. मात्र, जिल्ह्यात आठ ही तालुक्यात या साडेतीन महिन्यांपैकी एक महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरडे गेले आहेत.

Team Agrowon

Jalna News : पावसाळ्याचा साडेतीन महिन्यांचा कालावधी संपला आहे. मात्र, जिल्ह्यात आठ ही तालुक्यात या साडेतीन महिन्यांपैकी एक महिन्यांपेक्षा अधिक काळ कोरडे गेले आहेत. विशेष म्हणजे परतूर आणि बदनापूर तालुक्यात ५० पेक्षा अधिक दिवस पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे यंदा दुष्काळात जिल्ह्यात येऊन ठेपल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात यंदा जून महिन्यापासूनच पावसाने हुलकावणी दिली. जुलै महिन्यात पावसाच्या रिमझिमीवर जिल्ह्यातील पेरण्या उरकल्या. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या हलक्या पावसाच्या रिपरिपीवर खरीप पिकांनी तग धरला.

मात्र, उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत. मागील साडेतीन महिन्यात जिल्ह्यात ५५५.८३ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३८१.५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे तब्बल १७४.३३ मिलिमीटर पावसाची तूट आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील आठ तालुक्यात पावसाळ्याचे २८ ते ५३ दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे यंदा दुष्काळ जिल्ह्यात येऊन ठेपल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळतआहेत.

परतीच्या पावसाचा मेळ लागेना

जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार बरसले अशी अपेक्षा होता. मात्र, सध्या तरी तसेच चित्र दिसून येत नाही. जर परतीचा पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यात यंदा भयावह दुष्काळाला तोंड देण्याची वेळ येणार आहे.

२.५ मिलिमीटर पाऊस आधारित पावसाचे कोरडे दिवस

(आकडेवारी मिलिमीटरमध्ये, स्रोत नैसर्गिक आपत्ती विभाग)

तालुका कोरडे दिवस आतापर्यंतचा पाऊस गतवर्षीचा पाऊस

जालना ५३ ३८४.५० ८७७.१०

बदनापूर ४५ ३६०.३० ७०४.५०

भोकरदन २८ ४१५.३ ८२१.५०

जाफराबाद ५१ ४६९.२० ८७६.४०

परतूर ४७ ३०९.९० ७२७.८०

मंठा ४४ ३४१.९० ८३८.३०

अंबड ४६ ३८९.७० ६२६.७०

घनसावंगी ४९ ३८९.७० ६२६.४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT