Maharashtra Drought : राज्यात १३ जिल्ह्यांचा घसा कोरडा? विरोधी पक्षनेत्यांनी थेट आकडेवारीच मांडली

Vijay Wadettiwar On Drought Situation In Maharashtra : महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे की नाही हा सवाल विजय वडेट्टीवार व्यक्त केला.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon
Published on
Updated on

Drought like Conditions in Maharashtra : मागच्या चार महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईचे संकट आतापासूनच घोंगावू लागले आहे.

कोल्हापूर, कोकण, पुणे, सातारा जिल्ह्यातील काही भाग सोडल्यास राज्यातीस अनेक जिल्ह्यांना टँकरद्वारे पाणी देण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यातील ४५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झालेल्या जिल्ह्यांची यादी देत विजय वडेट्टीवार यांनी राज्य दुष्काळाच्या झळा सोसत असल्याची थेट आकडेवारीच जाहीर केली आहे. महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा किती तीव्र आहे याची माहिती सरकारला आहे की नाही हा प्रश्न आहे.

गेल्या अडीच महिन्यांमध्ये राज्यात अत्यंत कमी पाऊस पडला आहे. हीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात दुष्काळाचं मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ शकतं ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील खालील जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

#अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ४५ टक्के कमी पाऊस झालाय.

#सांगली तही सरासरी ४५ टक्के कमी पाऊस.

#नांदेड मध्ये सरासरीच्या १९ टक्के कमी.

#सोलापुर सरासरीच्या ३५ टक्के कमी.

#सातारा सरासरीच्या ४० टक्के कमी

#छत्रपती_संभाजीनगर सरासरी २७ टक्के कमी.

#जालना सरासरीच्या ४३ टक्के कमी

#बीड मध्ये सरासरीच्या ४३ टक्के कमी.

#धाराशिव मध्ये सरासरीच्या ३२ टक्के कमी.

#परभणी सरासरीच्या ३१ टक्के कमी

#अमरावती सरासरीच्या ३० टक्के कमी.

#वाशिम सरासरीच्या २२ टक्के कमी.

#अकोला सरासरीच्या २९ टक्के कमी पाऊस झालाय.

दुष्काळी संकट आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे अहवाल पुढे आले आहे. आपल्याला काय ? आपल्याला फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून मोकळं व्हायचं आहे, हाच पॅटर्न सरकार चालवताना महायुतीने हाती घेतला असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com