Drought in Sangli agrowon
ताज्या बातम्या

Drought in Sangli : सांगली जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा, ५०० पेक्षा जास्त गाव, वाडयांना टँकरने पाणीपुरवठा

Sangli Drought Condition : सांगली जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने जत तालुक्यात २५ गावात २३३ वाड्यांवर २९ टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

sandeep Shirguppe

Sangli Drought : सांगली जिल्ह्यात मागच्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी पाऊस झाल्याने ऐन पावसाळ्यात जत तालुक्यात २५ गावात २३३ वाड्यांवर २९ टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे. याचबरोबर आटपाडी तालुक्यात ६ गावात, ३४ वाड्यांना ८ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

सप्टेबर महिन्यातच जिल्ह्यातील एकूण ३१ गावात व २६७ वाड्यांना एकूण ३७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग कोरडा पडण्याची भिती आहे.

सांगली जिल्ह्यातील पश्चिम भागातील वाळवा, शिराळा, तासगाव यासह अन्य तालुक्यात काही प्रमाणात पाऊस झाला. या भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या परंतु या तालुक्यातीलही काही भागात पाऊस नसल्याने पेरण्या झाल्या नाहीत.

जूनपासून आज अखेर मिरज तालुक्यात २३४.७ मिलिमीटर पाऊस पडला. वाळव्यात २२९.५, ५९२, पलूसला ३६७.७, कडेगाव तालुक्यात १९८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जत तालुक्यात केवळ २०६, खानापूर परिसरात १९९, तासगाव तालुक्यात ५५८.१०, आटपाडीत २१३.५ व कवठेमहांकाळ तालुक्यात २९९ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई आहे. विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठल्याने काही तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. तसेच जत तालुक्यातील २८, कवठेमहांकाळ तालुक्यातील १, आटपाडी तालुक्यात ३ आणि तासगाव तालुक्यातील २ अशा एकूण ३४ खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

टँकर सुरू असणारी गावे

जिल्ह्यात जत तालुक्यातील निगडी खु., शेड्याळ, सिंदूर, पांढरेवाडी, वळसंग, एकुंडी, हळ्ळी, बसर्गी, सोन्याळ, सालेगिरी, पाच्छापूर, कुडनूर, वायफळ, गुगवाड, गिरगाव, संख, जाडरबोबलाद, काराजनगी, उमराणी, तिकोंडी, वेळोंडगी, मोकाशेवाडी, टोणेवाडी, माडग्याळ, सोनलगी, मुचंडी तसेच आटपाडी तालुक्यात आंबेवाडी, पुजारवाडी, पिंपरी खु., उंबरगाव, विठ्ठलापूर, पिंपरी बु. या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT