Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : रिमझिम पावसाचा बळीराजाला आधार

Kharif Season : मागील पंधरवड्यापासून शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग करत पाऊस पडेल, या अपेक्षेवर मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली.

Team Agrowon

Kharif Sowing : मागील पंधरवड्यापासून शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग करत पाऊस पडेल, या अपेक्षेवर मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली. जमिनीत पुरेसा ओलावा नसतानाही अनेकांनी धुळपेरणीला प्राधान्य देत काळ्या आईची ओटी भरली. दरम्यान, जेमतेम पाऊस होऊन पेरण्यांना वेग आला होता.

आजमितीस कुरुळा मंडळात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाणार, अशी भीती होती परंतु आता होत असलेल्या रिमझिम पावसामुळे बळीराजाला तात्पुरता आधार मिळाला असून चेहऱ्यावर आशादायक चित्र निर्माण होत आहे.

कुरुळा मंडळात शेतकरी मुख्य पिक म्हणून कधी कापूस तर कधी सोयाबीन लागवडीला प्राधान्य देतात. तर आंतरपिकासाठी तूर, मूग, उडीद पिकांचा विचार केला जातो. यंदाच्या खरीप पेरण्या लांबल्याने कापसाचे क्षेत्र घटणार, अशी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी केवळ ७० मिलीमीटर पावसावर पेरण्याची घाई केली.

नेहमीप्रमाणे पाऊस येईल, या अपेक्षेवर जवळपास ६५ टक्के क्षेत्रावर कापसाला प्राधान्य दिले आहे. मागील दोन हंगामात सोयाबीनचे घसरलेले दर ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरली त्यामुळे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक कापसाची लागवड करण्यात आली आहे. तर सोयाबीन पिकाचा पेरा मात्र घटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कंधार कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

कंधार तालुक्यातील विविध भागात मागील पंधरवड्यापासून पेरण्यासाठी शेतकऱ्यांनी लगबग केली होती. कुरुळा मंडळातील जवळपास ९० टक्के पेरण्या पूर्ण होत असताना दोन दिवसांपूर्वी कंधार तालुका कृषी अधिकारी यांनी १०० मिलीमीटर पावसानंतर पेरण्या करण्याचे आवाहन केले आहे. मंडळनिहाय प्रत्यक्ष माहिती न घेता पेरण्यानंतर केलेले आवाहन म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; बाजरीचे दर स्थिर, ढोबळी मिरची तेजीत, पपई दर टिकून तर काकडीला उठाव

NCCF Onion Procurement : ‘एनसीसीएफ’कडूनही माहिती देण्यास टाळाटाळ

MahaDBT : महा़डीबीटीकडून पूर्वसंमतीसाठी अडीच हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Lumpy Skin : खानदेशात ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण प्रक्रिया संथ

SCROLL FOR NEXT