MAIDC Agrowon
ताज्या बातम्या

MAIDC : ‘कृषिउद्योग’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. गोंदावले

Agriculture Department : कृषिउद्योग मंडळाकडून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निविष्ठांची खरेदी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. परंतु, या व्यवहारात सातत्याने संशयास्पद घडामोडी होत आहेत.

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळात गाजत असलेल्या निविष्ठा खरेदी निविदांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी डॉ. मंगेश गोंदावले यांची नियुक्ती केली आहे.

कृषिउद्योग मंडळाकडून १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निविष्ठांची खरेदी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. परंतु, या व्यवहारात सातत्याने संशयास्पद घडामोडी होत आहेत. त्यामुळे निविष्ठा खरेदी लांबणीवर पडत असून याबाबत काही कंपन्यांनी शासनापर्यंत तक्रारी केल्या होत्या.

महामंडळात अधिकारी व ठेकेदारांच्या लॉबीमुळे सतत उलथापालथी होत असतात. व्यवस्थापकीय संचालकपद सनदी अधिकाऱ्याकडे दिले जाते. यापूर्वी गणेश पाटील यांना या पदावर नियुक्त केले होते. परंतु, त्यांनी लॉबीच्या मनाप्रमाणे काम करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली केली गेली. त्यानंतर या पदावर पूर्णवेळ अधिकारी नियुक्त न करण्याची खेळी केली गेली.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘कृषिउद्योग’च्या व्यवस्थापकीय संचालकपदाची पूर्णवेळ जबाबदारी विद्यमान कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडे दिली होती. मुळात, कृषी आयुक्तालयाचे सध्याचे काम अतिशय व्यस्त असताना अतिरिक्त जबाबदारी देणे चुकीचे होते. परंतु, कृषी मंत्रालयाने सोयीसोयीने पूर्णवेळ अधिकारी देण्याचे टाळले. श्री. चव्हाण यांनी ‘कृषिउद्योग’ची जबाबदारी घेताच बैठकांचा धडाका लावला.

तसेच, ‘कृषिउद्योग’चा तोट्यात चालणारा व्यावसायिक गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी कृषी खात्याकडील निविष्ठांच्या खरेदीचे अधिकार ‘कृषिउद्योग’ला देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता.

दरम्यान, निविष्ठा खरेदीसाठी सुरु असलेली प्रक्रिया संशयास्पदपणे वळणे घेत राहिल्यामुळे ‘कृषिउद्योग’ सतत चर्चेत राहिले. त्यात पुन्हा महामंडळाने महाव्यवस्थापकपदाच्या भरतीत नियमबाह्य कामकाज झाले. राज्य शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आता डॉ. गोंदावले यांच्याकडे पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकपद आल्यामुळे निविष्ठा खरेदीबाबत नेमकी काय भूमिका घेतली जाते, याकडे कृषी आयुक्तालयाचे लक्ष आहे. डॉ. गोंदावले हे २०२० मधील सनदी अधिकारी तुकडीचे सदस्य असून ते कला शाखेचे पदव्युत्तर पदवीधर, आचार्य पदवीप्राप्त आहेत. त्यांनी यापूर्वी वस्तू व सेवा कर विभागाचे उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते ‘महावितरण’चे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Quality Export Banana: धाराशिव जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी पोषक; कोपार्डेकर

Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू

Karnataka Sugarcane Protest: बेळगावात ऊसदर आंदोलन पेटले, हत्तरगी टोल नाक्याजवळ दगडफेक, मंत्र्यांच्या कारवर चप्पला भिरकावल्या

Agrowon Podcast: हरभऱ्याचे भाव कमीच; मक्याचा भाव दबावातच, सोयाबीन भाव स्थिर, कापूस तसेच मिरचीचे दर टिकून

Agriculture Loan: कर्जमुक्‍त शेतकऱ्यांना तत्काळ कर्जाची उपलब्धता करा

SCROLL FOR NEXT