Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : पीक नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी पैसे देऊ नका

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे काम संबंधित विमा कंपनी आणि कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

टीम ॲग्रोवन

वाशीम : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे (Kharif Season Heavy Rain) ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान (Crop Damage) झाले आहे, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पीक नुकसानीचे सर्वेक्षण (Crop Damage Survey) करण्याचे काम संबंधित विमा कंपनी (Crop Insurance Company) आणि कृषी विभागामार्फत (Agriculture Department) करण्यात येत आहे. पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, नुकसानीचे सर्वेक्षण हे वस्तुनिष्ठ करण्यात येत आहे.

त्यामुळे पीक नुकसान नसताना चुकीने पीक नुकसान झाल्याचे दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीला पैशाचे आमिष दाखवू नये. तसेच कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा सर्वेक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही. त्यामुळे अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सन २०२२-२३ या वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. ८३ हजार ७५० शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पीक नुकसानीबाबत पूर्व सूचना दिल्या आहे. प्राप्त पीक नुकसानीच्या तक्रारीच्या अनुषंगाने ५० हजार ५७५ शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्यांतून शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त अर्जाची संख्या जास्त आहे. त्यामुळे काही ठिकाणी काही शेतकरी माझे पीक नुकसानीचे सर्वेक्षण आधी करा, असा आग्रह पीकविमा कंपनीच्या सर्वेअरकडे करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

पीक नुकसान सूचना पत्राचे सर्वेक्षण विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागामार्फत नि:शुल्क करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भूलथापांना बळी न पडता कोणत्याही व्यक्तीस सर्वेक्षण शुल्क अथवा पैसे देऊ नये. याबाबत कुणीही पैशाची मागणी केल्यास संबंधित गावचे कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आवश्यकता भासल्यास नजीकच्या पोलिस स्टेशनला तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT