Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : हाती पैसा नसल्याने दिवाळी अंधारात

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या सावटाखाली दिवाळी उत्सव सूनासुणा गेला. यंदा ऐन सुगीच्या दिवसात परतीच्या अति पावसाने अपेक्षांवर पाणी फिरवले आहे.

मुकुंद पिंगळे

प्रकाशाचा उत्सव असलेले दीपावली शेतकऱ्यांसाठी (Farmers Diwali) मात्र अंधारात असल्याची स्थिती आहे. पावसामुळे सोंगणी केलेली पिके पाण्याखाली (Crop Damage) असल्याने अनेक ठिकाणी काढणी झालीच नाही. काहींना शेतमाल खळ्यांवर आणणे कठीण झाले आहे, ज्यांनी खळ्यावर माल आणला त्याच मळणीपूर्वीच मोड फुटल्याचे गंभीर चित्र आहे. जिल्ह्यात अनेक शेतकरी हंगामी भाजीपाला पिके घेतात. त्यामध्ये टोमॅटो लागवड (Tomato Sowing) झाल्यानंतर फळधारणा सुरू झाली.

मात्र एक दोन तोडे होऊन हंगाम संपुष्टात आला. मिरची ढोबळी मिरची, वेलवर्गीय भोपळा, कारले, दोडका, गिलके पिकांमध्येही मर होऊन नुकसान वाढलेले आहे. कोबी, फ्लावर पिकांना बुरशीजन्य रोगांचा फटका बसला आहे, तर थोडीफार वाचलेली पिके पाण्याखाली गेल्याने हाती काहीच आले नसल्याने शेतकरी मोठा चिंतेत आणि आर्थिक गर्तेत सापडला आहे.

ओल्या दुष्काळ छायेत दिवाळी...

खरीप लाल कांद्याच्या लागवडीमध्ये बुरशीजन्य रोगांचा विळखा वाढला आहे, त्यामुळे माल वेळेवर बाजारात आलेला नाही. द्राक्ष छाटणी कामांना वेग आला मात्र पाऊस सुर झाल्यानंतर शेतकऱ्याची दिवाळी फवारण्या करण्यातच गेल्याची स्थित आहे. उन्हाळ कांद्याचे टाकलेले बियाणे खराब झाल्याने आगामी रब्बी कांद्याला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे ‘दिवाळी आली, पण ओल्या दुष्काळ छायेत’. ज्याचे कष्ट त्याला या दुःखाची सल अधिक अशीच सणासुदीला परिस्थिती आहे.

पावसाचा प्रकोप झाल्याने भीषण परिस्थिती आहे. सततचा पाऊस त्यास वेळेवर मजुरांची उपलब्धता नाही. विनवण्या करून मजुर शेतात यायला राजी होतात. मात्र मजुरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पावसामुळे उत्पादन तर नाही, मात्र शाश्वत उत्पन्नाचे साधन अडचणीत आले आहे

पंडितराव चौरे, शेतकरी, धोंडगव्हाण, ता.चांदवड

पावसाने शिवारात माती सुद्धा ठेवली नाही.अतिवृष्टीची भीती वाटू लागली आहे. पाऊस आला की अंगाचा थरकाप होतो बस एवढेच सांगेल. -

मधुकर डावरे, शेतकरी, कोनांबे, ता.सिन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT