Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : एक लाख शेतकऱ्यांना मदत वाटप

टीम ॲग्रोवन

हिंगोली ः यावर्षीच्या (२०२२) जून, जुलै, ऑगस्ट मधील अतिवृष्टी (Heavy Rain), पुरामुळे (Flood) झालेल्या पीक नुकसानीबद्दल (Crop Damage) हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ९७० शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १५७ कोटी ४ लाख ५२ हजार रुपये निधी मिळाला आहे. गुरुवार (ता. २२) पर्यंत चार तालुक्यांतील १ लाख ८ हजार ५९४ शेतकऱ्यांना ९२ कोटी २० लाख १९ हजार २९६ रुपये (५८.७१ टक्के) मदतीचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या (Revenue Department) सूत्रांनी दिली.

यंदा अतिवृष्टी, पुरामुळे हिंगोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण १ लाख १३ हजार ६२० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. तसेच सततच्या पावसामुळे ९६ हजार ६७७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले.

त्याबद्दल १३२ कोटी १४ लाख ९३ हजार ८०० रुपये निधीची मागणी केलेली आहे. अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल एकूण १५७ कोटी ४ लाख ५२ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यात जिरायती क्षेत्रातील बाधित १ लाख २५ हजार ५७५ शेतकऱ्यांच्या १ लाख ११ हजार ७४८ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपयेनुसार १५१ कोटी ९७ लाख ७३ हजार रुपये, बागायती क्षेत्रातील बाधित ८ हजार २२७ शेतकऱ्यांच्या १ हजार ८५७ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये नुसार ५ कोटी १ लाख ३९ हजार रुपये, बहुवार्षिक फळ पिकांखालील १५ हेक्टरवरील नुकसानीबद्दल १६८ शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपयेनुसार ५ लाख ४० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिरायती, बागायती, फळपीकांच्या नुकसानीबद्दल बाधित शेतकऱ्यांना ३ हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात आहे. मदतीची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. गुरुवार (ता. २२) पर्यंत कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या चार तालुक्यातील १ लाख ८ हजार ५९४ शेतकऱ्यांना ९२ कोटी २० लाख १९ हजार २९६ रुपये एवढी रक्कम वाटप करण्यात आली.

तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

अतिवृष्टी मदत वाटप स्थिती (कोटी रुपये)

तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र प्राप्त निधी वाटप शेतकरी रक्कम

कळमनुरी ३८९२५ ३४८६५ ४९.०५५२ १५३५९ १२.३८१३

वसमत ४६१२० ४१०४८ ५६.७०८४ ६८०८० ५५.३३०५

औंढा नागनाथ ११६७० ५२५० ७.१४ ४२०१ २.५७०४

सेनगाव २९१०३ २३७०२ ३२.२३४७ २०९५४ २१.९१९६

हिंगोली ८१५२ ८७५५ ११.९०६८ ००० ०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

Hailstorm : माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडी परिसरात गारपीट

SCROLL FOR NEXT