Crop Damage : सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान वाढले

आता सप्टेंबरमध्येही गेल्या दहा दिवसांत सुमारे ३६ हजार हेक्टर एकर पिकाला अतिवृष्टीचा तडाखा बसला. सर्वाधिक नुकसान तेल्हारा तालुक्यात २७,१६१ हेक्टरवर झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

अकोला ः आधी जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसाने (Heavy Rainfall) मोठे नुकसान (Crop Damage) केलेले असतानाच आता सप्टेंबरमध्येही गेल्या दहा दिवसांत सुमारे ३६ हजार हेक्टर एकर पिकाला अतिवृष्टीचा (Wet Drought) तडाखा बसला. सर्वाधिक नुकसान तेल्हारा तालुक्यात २७,१६१ हेक्टरवर झाले आहे.

Crop Damage
Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी

अकोला जिल्ह्यामध्ये झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन, कपाशी, तूर व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयांनी याबाबत प्राथमिक अहवाल तयार करून जिल्ह्याला पाठवला. अकोला, मूर्तिजापूर, अकोट व तेल्हारा तालुक्यांतील ३६,२७२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. अकोला तालुक्यातील सोयाबीन, कपाशी व तूर पिकांचे अतिवृष्टीमुळे २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे १३७ हेक्टर, अकोट तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर व फळपिकांचे ८७७४ हेक्टर, तर सर्वाधिक तेल्हारा तालुक्यात सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे २७,१६१हेक्टर असे ३६,२७२ हेक्टर क्षेत्र बाध्त झाले.

बार्शीटाकळी, बाळापूर व पातूर तालुक्यांत नुकसान नसल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. वादळवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. या वर्षी पेरलेल्या बियाण्याचा, लागवडीसाठी केलेला खर्च निघेल की नाही अशी चिंता भेडसावत आहे.

- अशोक पाटील मोहोकार, शेतकरी, वारुळा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com