Government Aid Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अतिवृष्टिग्रस्तांना ७१८ कोटी मदत निधीचे वितरण सुरू

जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. सुमारे सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांचे पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी (Heavy Rainfall)झाली. सुमारे सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांचे पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. हा निधी अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे (Ravishankar Chalwade) यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. जुलै महिन्यात तब्बल ६०६ मिलिमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीचा फटका सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांना बसला. यात पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.

हा निधी शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सदर निधी प्राप्त झाला आहे. नांदेड जिल्ह्याला यापूर्वीच ८ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार इतर जिल्ह्याच्या अगोदर निधी मिळाला. एकूण जिल्ह्यास ७१७ कोटी ८८ लाख रुपये निधी प्राप्त झाला. या निधीचे जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाटप सुरू आहे, असे श्री. चलवदे यांनी कळविले आहे.

तालुकानिहाय वितरित निधी नांदेड- २५ कोटी ८९ लाख, अर्धापूर -२९ कोटी १६ लाख, कंधार -५५ कोटी १२ लाख, लोहा ६१ कोटी ५ लाख, देगलूर ४२ कोटी ९५ लाख, मुखेड ५४ कोटी ७० लाख, बिलोली- ४० कोटी ३५ लाख, नायगाव- ४५ कोटी ५ लाख, धर्माबाद- २९ कोटी ५३ लाख, उमरी- ४० कोटी ११ लाख, भोकर- ५२ कोटी ४३ लाख, मुदखेड- २४ कोटी २७ लाख, हदगाव-८५ कोटी २० लाख, हिमायतनगर- ४२ कोटी ७४ लाख, किनवट-६७ कोटी ९ लाख, माहूर- २२ कोटी २० लाख.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT