Fig, Custard Apple Management
Fig, Custard Apple Management  Agrowon
ताज्या बातम्या

Custard Apple : सीताफळ उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांमधील वाद मिटला

टीम ॲग्रोवन

सासवड, जि. पुणे ः पालखी महामार्गावर सकाळी सीताफळाचा बाजार (Sitafal Market) भरतो. या बाजारात शेतकरी व व्यापारी यांच्यात तांत्रिक वाद (Farmer Trader Dispute) सुरू होता. पण ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या वतीने यात लक्ष घालून समन्वयातून हा वाद मिटविण्यात आल्याची माहिती ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास मेमाणे यांनी दिली.

शेतकरी क्रेटमध्ये सीताफळ भरून घेऊन येतात या क्रेटमध्ये सीताफळ खराब होऊ नये म्हणून सीताफळाचा पाला टाकला जायचा. परंतु व्यापाऱ्यांनी यावर निर्बंध घातले होते. हे निर्बंध शेतकऱ्याच्या दृष्टीने चुकीचे होते. यात मालाचेही नुकसान होऊन दर कमी मिळत होता. त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता. ग्राहक कल्याण फाउंडेशन पुरंदर तालुका कार्यकारिणीच्या वतीने सीताफळ बाजारातील व्यापाऱ्यांशी बैठक घेऊन खरेदी-विक्री संदर्भात तोडगा काढला.

दिवाळीच्या मुहूर्तावर सासवडच्या सीताफळ बाजारातील व्यापाऱ्यांनीकाही अटी व नियम जाहीर केले होते. शेतकऱ्यांसाठी हे सर्व त्रासदायक होते. यादरम्यान बाजारपेठेमध्ये सीताफळाची मंदी झाली होती. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून सासवडच्या सीताफळ बाजारात सर्व व्यापारी व शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्यात समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारी सकाळी बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये सर्वमान्य तोडगा निघाला. शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे सीताफळे बाजारात आणावीत, असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले.

या बैठकीसाठी ग्राहक कल्याण फाउंडेशनचे पदाधिकारी उत्तमराव झेंडे, संतोष मगर, संतोष काकडे, रामदास मेमाणे, बबनराव काळे, पंढरीनाथ कामथे, नाना फराटे, कैलास जाधव, प्रशांत वांढेकर, अनिल खेडेकर उपस्थित होते.

सासवड येथील बाजारात पुणे, सांगली, कराड, वेल्हा, महाड, कोल्हापूर, मिरज, मुंबई या ठिकाणावरून शे-दीडशे व्यापारी रोज सासवड बाजारात येत असतात. तर सासवड व पुरंदर तालुक्यातून हजारो शेतकरी आपला माल घेऊन या ठिकाणी येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : खुशखबर ! मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळात होणार दाखल

Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

Crop Damage : माळीनगरची पिके पाण्याअभावी होरपळली

Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

Agriculture Funds : कृषी योजनांतून ३७ कोटींवर निधी खर्च

SCROLL FOR NEXT