Mahad News  Agrowon
ताज्या बातम्या

Mahad Flood Condition : महाडमध्‍ये नागरिकांचे स्‍थलांतर

Heavy Rain Mahad : वाढती पूर परिस्थिती व ग्रामीण भागात पूर व दरडीचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने शहर व तालुक्यातील ११५ कुटुंबातील ४०४ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे.

Team Agrowon

Mahad News : वाढती पूर परिस्थिती व ग्रामीण भागात पूर व दरडीचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने शहर व तालुक्यातील ११५ कुटुंबातील ४०४ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील अनेक पुलांवरून पाणी जात आहे तर पाचाड घाट व मुंबई-गोवा महामार्गावर काफिला बंदर या ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

शहरामध्ये पूरसदृश स्‍थिती निर्माण झाली असून भीमनगर, वीरेश्वर झोपडपट्टी तर दादली पूल झोपडपट्टी येथील ७० नागरिकांना सुरक्षित स्‍थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तालुक्यातही पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती व दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता अकरा गावांतील ४०४ नागरिकांना हलविण्यात आल्याची माहिती महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली. नागरिकांना भोजन व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अनेक पूल पाण्याखाली

महाड शहर तसेच तालुक्यांमध्ये अनेक पुलावरून पाणी गेल्याने त्या ठिकाणची वाहतूक बुधवारी ठप्प झाली. शहरातील दादली पूल तसेच गांधारी नदीवरील पुलावरून पाणी गेल्याने महाड शहराचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे.

दापोली-पंदेरी या मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. महाड म्हाप्रळ मार्गावरील रावढळ पुलावर देखील सुमारे अडीच फूट पाणी होते. त्यामुळे या मुख्य मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प होती.

पाचाड घाटमार्ग बंद

रायगड किल्‍ला मार्गावरील पाचाड घाटामध्ये दरड कोसळल्याने रस्‍ता मार्ग बंद झाला होता. प्रशासनाने तातडीने दरड हटवण्याचे काम पूर्ण करून मार्ग सुरू केला. मुंबई-गोवा महामार्गावर काफीला बंदर येथे दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळित झाली होती.

दरड हटविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले. शिवथरघळ ते बिरवाडी रस्त्यावर बारसगावाजवळ रस्ता तुटल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate: सदनिका गैरव्यवहार प्रकरण भोवले, माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती काढली, आता बिनखात्याचे मंत्री

Flood Relief Fund: अतिवृष्टिग्रस्तांच्या मदतनिधीला शासनाकडून विलंब

Cotton Picking: कपाशीची दोन वेचण्यांतच उलंगवाडी

Soybean Procurement Centres: सोयाबीन खरेदीला केंद्रांवर वेग नाही

Procurement Centres: अपात्र शेतकरी कंपन्यांना खरेदी केंद्राची खिरापत

SCROLL FOR NEXT