Maharashtra Rain Update : चांगल्या पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : आज (ता. २३) आणि उद्या (ता. २४) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००२ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यानुसार पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील.
 Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

डॉ. रामचंद्र साबळे
------------
Maharashtra Weather News : आज (ता. २३) आणि उद्या (ता. २४) महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००२ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यानुसार पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील. हवेच्या दाबाची ही स्थिती मंगळवारी (ता. २६) देखील कायम राहील. मात्र त्याचवेळी बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील भागावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्राकार वारे वाहतील. बुधवारी (ता. २६) चक्राकार वाऱ्यांचे क्षेत्र वाढेल. त्यामुळे बंगालच्या उपसागराचे उत्तरेकडील व पश्‍चिमेकडील भागावर वेगाने वारे वाहतील. सोबत ढग वाहून आणतील आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल. त्यात महाराष्ट्राचा पूर्व भाग व्यापला जाऊन जोरदार पावसाची शक्यता निर्माण होईल. तसेच पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा भाग आणि पूर्वेकडील पश्चिम महाराष्ट्राचे भागांत पावसाची शक्यता निर्माण होईल.

गुरुवारी (ता. २८) महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके वाढतील. तसेच बंगालचे उपसागरातील हवेच्या दाबातही वाढ होईल. त्यामुळे पावसात उघडीप राहणे शक्य आहे. शुक्रवार व शनिवारी (ता. २७, २८) ही स्थिती कायम राहील.
अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस, तर बंगालच्या उपसागराचे व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस आणि प्रशांत महासागराचे ३१ अंश सेल्सिअस आहे. अद्याप ‘एल निनो’चा प्रभाव सुरू झालेला नाही.

 Rain
Rain Update : आठवड्याच्या सुरुवातीस चांगल्या पावसाची शक्यता

कोकण


आज (ता.२३) ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४० ते ४८ मि.मी., तर रत्नागिरी जिल्ह्यात ५७ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. २४) रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४६ ते ५० मिमी, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ६० ते ६५ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल. वाऱ्याचा ताशी वेग रायगड व पालघर जिल्ह्यांत १३ ते १४ किमी; ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांत १५ ते १६ किमी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८८ टक्के राहील.

 Rain
Rain Update In Maharashtra : राज्यात पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्र


आज (ता.२३) धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत १२ ते १४ मिमी, तर जळगाव व नाशिक जिल्ह्यांत १९ ते २० मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२४)
धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ४ ते ५ मिमी, तसेच नंदुरबार जिल्ह्यात २० मिमी तर नाशिक जिल्ह्यात ३३ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग धुळे जिल्ह्यात २१ किमी राहील. कमाल तापमान नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७२ टक्के राहील.

मराठवाडा


आज (ता.२३) छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत ४ ते ५ मिमी, धाराशिव, लातूर, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २३ ते २८ मिमी, तर परभणी जिल्‍ह्यात १४ मिमी आणि नांदेड जिल्ह्यात ६६ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२४) हिंगोली व जालना जिल्ह्यांत ८ ते ११ मिमी, परभणी जिल्ह्यात १८ मिमी, बीड जिल्ह्यात २६ मिमी, नांदेड जिल्ह्यात ४० मिमी तर धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ४८ ते ५० मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेय, वायव्य व नैऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १८ ते २२ किमी
इतका वाढेल. कमाल तापमान बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर उर्वरित जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ८४ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ


आज (ता.२३) वाशीम जिल्ह्यात २७ मिमी, बुलडाणा जिल्ह्यात ३६ मिमी, अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४१ ते ४८ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२४) अमरावती जिल्ह्यात २३ मिमी, तर बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ११ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १७ ते २० किमी राहील. कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९०, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७४ टक्के राहील.

मध्य विदर्भ


आज (ता.२३) यवतमाळ जिल्ह्यात ६३ मिमी, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३१ ते ३८ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता. २४) नागपूर जिल्ह्यात ४० मिमी, वर्धा जिल्ह्यात २८ मिमी आणि यवतमाळ जिल्ह्यात १७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १४ ते १८ किमी राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७५ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

उद्या (ता. २४) चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३० ते ३४ मिमी, तर गोंदिया जिल्ह्यात २८ मिमी पावसाची शक्यता आहे. आज (ता. २३) गडचिरोली जिल्ह्यात ५२ मिमी, भंडारा जिल्ह्यात ४० ते ४८ मिमी, तर गोंदिया जिल्ह्यात ३७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत ५ ते ९ किमी, तर चंद्रपूर जिल्ह्यात ताशी १४ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९६ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८९ टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज (ता.२३) कोल्हापूर जिल्ह्यात ४८ मिमी, सांगली जिल्ह्यात ३२ मिमी, सातारा जिल्ह्यात १६ मिमी, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत २५ ते २६ मिमी व नगर जिल्ह्यात ११ मिमी पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२४) नगर जिल्ह्यात १८ मिमी, पुणे व सोलापूर जिल्ह्यांत ४० ते ४८ मिमी, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ५७ मिमी आणि कोल्हापूर जिल्ह्यात ६२ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग १९ ते २२ किमी राहील. कमाल तापमान सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर नगर व सांगली जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत कमाल तापमान २९ ते ३० अंश राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८५ टक्के राहील.

कृषी सल्ला

पेरणी झालेल्या ठिकाणी कोळपणी व खुरपणी करून तणनियंत्रण करावे. - फळबाग लागवडीसाठी तयार केलेल्या खड्ड्यात रोपांची लागवड करावी. - शेतातून अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. -

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com