Jayakwadi Dam Agrowon
ताज्या बातम्या

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाच्या २७ दरवाजांतून विसर्ग सुरू

तुडुंब असलेल्या जायकवाडी प्रकल्पात १ जूनपासून २४३.३० टीएमसी पाण्याची आवक झाली. यापैकी १८७.४१ टीएमसी पाणी गोदावरीच्या नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प (Jayakwadi Dam) तुडुंब आहे. गुरुवारी (ता. २१) या प्रकल्पाच्या सर्व २७ दरवाजांतून गोदावरी नदीपात्रात (Godavari River) ८४,८८८ क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तुडुंब असलेल्या जायकवाडी प्रकल्पात १ जूनपासून २४३.३० टीएमसी पाण्याची आवक झाली. यापैकी १८७.४१ टीएमसी पाणी गोदावरीच्या नदीपात्रात सोडण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पात ६०९९४ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

त्याचवेळी प्रकल्पाच्या १० ते २७ क्रमांकाच्या १८ दरवाजांमधून ७५ हजार ४५६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या नदीपात्रात सुरू होता. हे सर्व १८ दरवाजे जवळपास ४ फुटांनी उघडलेले होते.

दरम्यान, जायकवाडी प्रकल्पातून गुरुवारी सकाळी ९:४५ ते १० वाजेदरम्यान दरवाजा क्रमांक १ ते ९ असे एकूण ९ दरवाजे ०.५ फूट उंचीवर स्थिर करून ४७१६ क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची सूचना जायकवाडी प्रकल्पाच्या प्रशासनाने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Crop Loan Rates: पीकनिहाय कर्जदर निश्चित

Sugarcane Payments Pending: साखर कारखान्यांकडे अडकले शेतकऱ्यांचे ८७६ कोटी रुपये

Jowar Prices Low: ज्वारीला कमी दर; शेतकरी आर्थिक अडचणीत

SCROLL FOR NEXT