Agriculture Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : डिंभे धरणातून उजव्या, डाव्या कालव्याला पाणी सोडले

Water Shortage : ऐन पावसाळ्यात पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. यामुळे डिंभे (हुतात्मा बाबू गेनू सागर) धरणातून उजव्या व डाव्या कालव्याला रविवारी (ता.२५)पाणी सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : ऐन पावसाळ्यात पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. यामुळे डिंभे (हुतात्मा बाबू गेनू सागर) धरणातून उजव्या व डाव्या कालव्याला रविवारी (ता.२५)पाणी सोडण्यात आले आहे.

डाव्या कालव्याला ५०० क्युसेक, तर उजव्या कालव्याला १८० क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्याचा आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील ५० गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे.

सध्या धरणात ०.४६ टीएमसी म्हणजेच सरासरी साडेतीन टक्के पाणीसाठा आहे. आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांतील ५० गावांना डिंभे उजव्या कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. जून महिना संपत आला तरीही पावसाअभावी येथील शेतीपिके जळू लागली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी उजव्या कालव्याला पाणी सोडावी, अशी मागणी केली होती.

या मागणीला यश येऊन डिंभे धरणाचे उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. मात्र धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे हे आवर्तन जास्त दिवस चालणार नाही. त्यामुळे जे पाणी या कालव्याला येईल त्या पाण्याचा योग्य उपयोग शेतकऱ्यांनी करावा तसेच पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, अभियंता दत्ता कोकणे यांनी केले.

‘नदीला पाणी सोडा’

जलसंपदा विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढल्यामुळे बंधाऱ्यात असणारे पाणी वाहून गेले आहे. तर शिल्लक असलेले पाणी झपाट्याने कमी होऊ लागले आहे. त्यामुळे नदीला पाणी सोडावे, अशी मागणी शरद बँकेचे संचालक नितीन वाव्हळ, पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT