Paddy Procurement | Paddy MSP Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Procurement : सात-बारावर नोंदीअभावी भात विक्रीत अडचणी

कोकणात पावसाळ्यात प्रामुख्याने भातशेती केली जाते. वर्षभरासाठी राखून ठेवल्यानंतर उर्वरित भाताची शेतकऱ्यांकडून विक्री केली जाते.

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी : जिल्ह्यात आधारभूत भावाने भाताची खरेदी (Paddy Procurement) करणारी केंद्र सुरू झाली आहेत. भाताचा हमी भाव (Paddy MSP) चांगला असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात विक्री केंद्रावर भाताची विक्री करतो; मात्र, खरीप हंगामातील पिकांची केलेली ई-पीक पाहणी अहवाल ऑनलाइन पद्धतीने करताना अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर नोंद न झाल्याने भाताची विक्री करण्यात अडचणी येत आहेत.

कोकणात पावसाळ्यात प्रामुख्याने भातशेती केली जाते. वर्षभरासाठी राखून ठेवल्यानंतर उर्वरित भाताची शेतकऱ्यांकडून विक्री केली जाते. शासनाने निर्धारित केलेल्या खरेदी-विक्री संघात हमी भाव पद्धतीने भाताची खरेदी करण्यासाठी ‘अ’ वर्गाच्या भाताला २०६० रुपये प्रति क्विंटल तर ‘ब’ वर्गाच्या भाताला २०४० रुपये दर निश्चित केला आहे.

त्यामुळे भाताची हमी भाव केंद्रावर विक्री करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत असून, त्यांना आधी आपल्या शेतीच्या सात-बारा उतारा, बँक पासबुक, जमिनीचा आठ-अ उतारा, आधारकार्ड यांची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक केले आहे; मात्र, ऑनलाइन पीक पाहणी करताना त्यावर क्षेत्राची नोंद सात-बारा उताऱ्यावर न झाल्याने शेतकऱ्यांना भात विक्री करताना हेलपाटे मारावे लागत आहेत.

भाताची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर सात-बारा उतारा न्यावा लागतो आणि त्या उताऱ्यावर २०२२ च्या पावसाळ्यात करण्यात आलेल्या ई-पीक पाहणी अहवालाची नोंद नसल्यास भाताची खरेदी हमी भाव केंद्रावर केली जात नाही. अहवालाची नोंद शेतकऱ्यांच्या सात-बारावर होण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत आणि त्यामुळे ई-पीक पाहणी होऊनदेखील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील भातपिकाची नोंद उताऱ्यावर होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून सातत्याने समोर येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT