ताज्या बातम्या

Soil Nutrient : जमिनीतील अन्नद्रव्यांचा उपसा, पुरवठा यामधील तफावत कमी करावी

टीम ॲग्रोवन

परभणी : शेतकऱ्यांनी पीक पोषणातील (Crop Nutrition) विविध पैलू पैकी जमिनीतील अन्नद्रव्यांचा ( Soil Nutrient) उपसा आणि पुरवठा या मधील तफावत कमी करण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांना उपयुक्‍त संशोधनासाठी विद्यापीठातील विविध प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्‍या पाहिजेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था शाखेतर्फे जागतिक मृदादिना निमित्त आयोजित मृदा सप्ताह उद्घघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. सय्यद इस्माईल, मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर आदीची उपस्थिती होती.

डॉ. इंद्र मणी म्‍हणाले,की नद्यांच्या काठी विकसित झालेल्या मानवी संस्‍कृतीच्या अस्तित्वाचा आधार ठरलेली सुपीक जमीन दिवसंदिवस प्रदूषित होत आहे. प्रास्‍ताविकात डॉ. वैद्य यांनी मृदा सप्ताह दरम्‍यान आयोजित शेतकरी तसेच विद्यार्थ्‍यांनमध्‍ये माती बाबत जनजागृती उपक्रमाची माहिती दिली.

सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. वाईकर यांनी मानले. डॉ. स्वाती झाडे, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. स्नेहल शिलेवंत, भानुदास इंगोले, अजय चरकपल्ली, शुभम गीरडेकर, प्रिया सत्वधर, बुद्धभुषण वानखेडे, आंनद नंदनवरे आदींसह विभागातील प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT