वनस्पतीमध्ये वेगवेगळी सुमारे चाळीस मूलद्रव्ये कमी जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यातील एकूण सतरा अन्नद्रव्ये वनस्पतींच्या वाढीकरिता विशेष महत्त्वाची आहेत. त्या त्या अन्नद्रव्याची गरज (Nutrient Management) ही अन्य कोणत्याही पर्यायी मूलद्रव्यामुळे भागवता येत नाही. त्यांची कमतरता भासल्यानंतर वनस्पतीच्या बाह्य भागावर त्याची लक्षणे दिसून येतात. ती वेळीच ओळखून उपाययोजना करणे गरजेचे असते. सोबतच उती किंवा पर्ण परीक्षणाद्वारेही कमतरता अचूकपणे जाणून घेता येते. त्यानुसार वेळीच जमिनीतून अथवा फवारणीद्वारे या अन्नद्रव्याची पूर्तता करता येते.
स ध्या उती, पर्ण परीक्षण पद्धती विकसित झाली असून, त्याद्वारे वनस्पतीतील अंतर्गत प्रक्रिया जाणून घेता येतात. सर्वच पिकांसाठी विशेषत: फळबागेसाठी हे परीक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. अनेक वेळा एखाद्या मूलद्रव्याची कमतरता बाह्य अंगावर दिसून येण्यास उशीर होतो. तसेच दोन किंवा अधिक अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास नेमकेपणाने कोणत्या मूलद्रव्याची कमतरता आहे, हे निश्चित करणे अवघड ठरते. त्याच प्रमाणे एखाद्या मूलद्रव्याची अधिकताही जाणून घेणे आवश्यक असते. अशा वेळी पर्ण, उती परीक्षणाचे तंत्र उपयोगी ठरू शकते. तज्ज्ञांच्या साह्याने वेळीच मूलद्रव्याची पूर्तता केल्यास पिकांच्या वाढीवर, पर्यायाने उत्पादनावरील विपरीत परिणाम टाळता येतात.
विविध फळझाडे, एकदल, द्विदल पिके, गळीत धान्ये, कपाशी, भाजीपाला पिकातील पानांचे नमुने कशा प्रकारे घ्यावेत, याची माहिती तक्ता १, २ व ३ मध्ये दिली आहे. पानांमधील सर्व साधारण अन्नद्रव्यांचे प्रमाण तक्ता ४ मध्ये दिलेले आहे. तर त्यानुसार करावयाच्या उपाययोजना तक्ता क्र. ५ मध्ये
दिल्या आहेत.
निरनिराळ्या पिकातील पर्ण विश्लेषणासाठी नमुना घ्यावयाची पद्धत.
अ.
क्र. पीक निर्देशक उती / पर्ण वाढीची अवस्था नमुन्याचा आकार
(पानांची संख्या)
१. गहू पान ओंबीवर येण्यापूर्वी ५०
२. ज्वारी ज्वारीच्या फुलोऱ्याखालील तिसरे पान फुलोरा २५
३. मका कणसाजवळील पाने निसवण्यापूर्वी १५
४. द्विदल पिके नुकतेच परिपक्व झालेले पान फुलोऱ्यात येण्यापूर्वी २००
५. सोयाबीन शेंड्याकडून दुसरे पान पेरणीनंतर दोन महिन्यांनी २५
६. भुईमूग नुकतेच परिपक्व कोवळे पान फुटवा २५
७. सूर्यफूल कोवळ्या पानाचे देठ फुलोरा येतेवेळी २०
८. कापूस शेंड्याकडून चौथ्या पानांचा देठ फुलोरा येतेवेळी ५०
तक्ता क्र. ३
निरनिराळ्या फळपिकात पर्ण विश्लेषणासाठी नमुना घ्यावयाची पद्धत
अ.
क्र. पीक निर्देशक उती / पर्ण वाढीची अवस्था नमुन्याचा आकार (पानांची संख्या)
१ लिंबू शेवटी वाढलेली पालवीचे पान फांदीच्या मधील ३ ते ५ महिने कालावधीची पाने ३०
२ केळी तिसरे पान पूर्णपणे उघडल्यानंतर मध्यभागाच्या शिरेच्या दोन्ही बाजूंस ३ इंच रुंदीच्या पटीत १६ व्या पानाच्या वेळी कोंब फुटण्याच्या अवस्थेत लागवडीनंतर ४ महिन्यांनी १५
३ आंबा फांदीच्या मधील पाने व देठ नवीन फांदीच्या मध्य भागाजवळील ४ ते ७ महिने कालावधीची पाने १५
४ संत्रा, मोसंबी चार महिने कालावधीची नुकतेच जुने झालेले पान ऑगस्ट ते ऑक्टोबर (आंबे बहर) ३०
५ डाळिंब शेंड्यांकडून ८ वे पान आंबे बहरासाठी एप्रिल व मृग बहरासाठी ऑगस्ट ५०
६ पेरू नुकतीच परिपक्व झालेली तिसरी जोडी पानाची बहर येण्याची वेळी (ऑगस्ट ते डिसेंबर) २५
७ द्राक्ष खोडाच्या शेजारच्या फांदीवरील पाचव्या पानांचा देठ कोंब फुटण्याच्या वेळी, फुले आल्यानंतर बहराच्या विरुद्ध बाजूला असलेले देठ २००
टीप ः उती/ पर्ण नमुना घेताना माती लागलेला, रोगग्रस्त व कीडग्रस्त नमुना नसावा.
निरनिराळ्या भाजीपाला वर्गीय पिकासाठी विश्लेषणासाठी पर्ण नमुना घ्यावयाची पद्धत
पीक निर्देशक उती/ पर्ण वाढीची अवस्था नमुन्याचा आकार (पानांची संख्या)
बटाटा वाढीच्या टोकाकडील ३ ते ६ पाने मोहराच्या अगोदर १० ते २०
कोबीवर्गीय मंडलाच्या मध्यापासून पहिले पक्व पान गड्डा येण्याच्या अगोदर १० ते २०
कंदवर्गीय मधले पक्व पान कंद मोठा होण्याच्या अगोदर २० ते ३०
पान वर्गीय नवीन पक्व पान मध्य वाढ ३५ ते ५५
टोमॅटो वाढीच्या टोकाकडील चौथे पान मोहराच्या सुरुवातीला २० ते २५
मुख्य अन्नद्रव्य पुरेसे प्रमाण (टक्के) सूक्ष्म अन्नद्रव्य पुरेसे प्रमाण (पीपीएम)
नत्र २.० - ५.० जस्त २० - १००
स्फुरद ०.२ - ०.५ लोह ५० - २५०
पालाश १.० - ५.० मँगेनीज २० - ३००
कॅल्शिअम ०.१ - १.० तांबे ५ - २०
मॅग्नेशिअम ०.१ - ०.४ मॉलिब्डेनम ०.१ - ०.५
गंधक ०.१ - ०.३ बोरॉन १० - १००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.