Sugar Mills Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Mills : गत हंगामातील महसूल विभागणी सूत्र यंदाच्या हंगामापूर्वीच निश्चित करा

इथेनॉल व अन्य घटकांपासून उत्पन्न वाढ झाली आहे. यामुळे मागील हंगामाचे महसुली विभागणी सूत्र (आरएसएफ) या हंगामापूर्वी निश्चित करावे, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’ने साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : यावर्षी साखरेला ३५ रुपयांपेक्षा जादा दर मिळाला आहे. याचबरोबर इथेनॉल व अन्य घटकांपासून उत्पन्न वाढ झाली आहे. यामुळे मागील हंगामाचे महसुली विभागणी सूत्र (आरएसएफ)(RSF) या हंगामापूर्वी निश्चित करावे, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’ (Aandolan Ankush) ने साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे (Dhanaji Chudmunge) म्हणाले,

की मागील एक वर्ष साखरेला क्विंटलला ३५०० रुपयांपेक्षा जादा दर मिळालेला आहे आणि इथेनॉलपासून कारखान्यांना जादाचे उत्पन्न मिळाले असून यावर्षी एफआरपीपेक्षा जादा महसुली विभागणी सूत्र निघणार आहे. परिणामी एफआरपीपेक्षा जादा दर शेतकऱ्यांना मिळू शकतो.

सी रंगराजन समितीच्या ७०ः३० सूत्रानुसार साखर व उप पदार्थांचे एकूण उत्पन्न काढून त्यातील ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा रेव्हिन्यू शेअरिंग फॉर्म्युलाचा २०१३ चा कायदा आहे. त्यानुसार हंगाम संपल्यावर १२० दिवसांत कारखान्यांनी आपले हिशेब साखर आयुक्तालयास सादर करायचे काही वर्षे दर कमी मिळत होता,

पण आता साखरेबरोबरच इथेनॉल आणि उत्पादकांना इतर चांगले मिळाल्याने शेतकऱ्यांना यंदा जादा रक्कम मिळू शकते. यावर्षी साखरेला व उप पदार्थांना मिळालेल्या बाजारभावाचा विचार केल्यास व आयुक्तालयाने प्रामाणिकपणे कारखान्यांचे हिशेब तपासल्यास एफआरपी सोडून आणखी १०० रुपये तरी मिळू शकतात व

जे कारखाने बी हेवी मोल्यासिसपासून इथेनॉल बनवत आहेत, त्यांना आणखी २५० रुपये शेतकऱ्यांना दुसरा हप्ता म्हणून द्यावे लागण्याची शक्यता आहे. यामुळेच आम्ही ही मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

Marathwada Water Storage: मराठवाड्यात ११ मोठ्या प्रकल्पांत १७६ टीएमसी उपयुक्त साठा  

Turmeric Varieties: सरस उत्पादकतेचे हळदीचे वाण विकसित करणार

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

SCROLL FOR NEXT