Farm Loan Waiver Updates: शेतकऱ्यांच्या थकित कर्जाबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी (दि. ६ मार्च) विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी ३० ऑक्टोबर, २०२५ रोजी उच्चाधिकार समिती गठीत केली होती. या समितीच्या अभ्यासासाठी राज्यातील बँकांमार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या थकीत कृषी कर्जाची व मागील पाच वर्षांमध्ये पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती बँकांकडून मागविण्यात आली. त्यानुसार बँकांकडील सुमारे ५४.६३ लाख थकीत कर्ज खात्यांपैकी ५२.८० लाख कर्ज खात्यांची माहिती समितीस सादर करण्यात आली, अशी माहिती सहकारमंत्र्यांनी लेखी उत्तरातून दिली आहे. .शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कळवणचे आमदार नितीन पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सहकारमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. .Farm Loan Waiver: थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीबाबत कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती.कर्जाच्या माहितीचे महाआयटी या संस्थेच्या सहाय्याने संगणकीय संस्करण तथा विश्लेषण उच्चाधिकार समितीमार्फत करण्याची कार्यवाही सुरु आहे. या संस्करणानंतर समितीकडून उपाययोजना तसेच शिफारशी शासनास सादर करण्यात येणार आहेत. उच्चाधिकार समितीच्या शिफारशी प्राप्त झाल्यानंतर राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे सहकार मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे. .Farm Loan Waiver: कर्जमाफीचा वंचित शेतकऱ्यांना लाभ देणार; सहकारमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन.शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या उच्चाधिकार समितीची स्थापना करून सुमारे अडीच महिने होऊनदेखील अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. तसेच कर्जमाफीचे निकष निश्चित न करणे, फक्त बँकांना सूचना दिल्या असल्याने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती गोळा करणे, पुनर्गठन अथवा कर्जमाफीचा आराखडा तयार करण्याबाबत प्रगती दिसत नसल्याबाबत नितीन पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.