Agriculture credit : कमी दराने शेतीमाल विक्रीपेक्षा तारणकर्ज योजनेचा लाभ घ्या

तारण कर्ज योजनेचा लाभ घेऊन त्यांचा शेतीमाल वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा, असे आवाहन उपमहाव्यवस्थापक रामेंद्रकुमार जोशी यांनी केले.
Agricultural credit
Agricultural creditAgrowon

नाशिक : पुरेशा साठवणूक व्यवस्थेअभावी काढणीनंतर एकाचवेळी बाजार समित्यां (Market Commite) मध्ये शेतीमालाची आवक होऊन मागणी व पुरवठ्यातील असमतोलामुळे शेतकऱ्यांना कमी दराने शेतीमालाची विक्री करावे लागते. अशावेळी शेतीमाल तारण कर्ज (Taaran Debt.) योजनेचा लाभ घेऊन त्यांचा शेतीमाल वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा, असे आवाहन उपमहाव्यवस्थापक रामेंद्रकुमार जोशी (Rajendrakumar Joshi) यांनी केले.

Agricultural credit
Pune APMC ; डमी अडत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक

लासलगाव (ता. निफाड) येथे वखार विकास आणि नियामक प्राधिकरण, नवी दिल्लीद्वारे प्रायोजित वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था, पुणे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ विभागीय कार्यालय, नाशिक व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या सभागृहात शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय जनजागृती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

Agricultural credit
Cotton Seed Technology : दोन वर्षांत नवे कापूस बियाणे तंत्रज्ञान येणार

ऑनलाइन तारण कर्ज योजनेसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर महामंडळाच्या गोदामात साठवणुकीस ठेवण्यात येणाऱ्या शेतीमालाच्या वखार पावतीवर ऑनलाइन तत्काळ कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे शेतकरी व ठेवीदार यांची वेळेची बचत होऊन कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते. वखार महामंडळ व राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनीकरिता अभिनव ऑनलाइन तारण कर्ज योजना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येत आहे.

Agricultural credit
सहवीज प्रकल्पांना हवाय दरवाढीसह अनुदानाचा ‘टेकू’

 याअंतर्गत पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना वखार पावतीवरील शेतीमालाचे किमतीच्या ७० टक्के कर्ज बँकेकडून संबंधितांच्या खात्यात आरटीजीएस अथवा एनईएफटीद्वारे जमा करण्यात येते. तारण कर्जाचा व्याज दर ९ टक्के असून, इतर बँकांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे.

राज्य वखार महामंडळाने शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, किटकनाशके यांची शास्त्रोक्त पद्धतीने सुरक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे जोशी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com