Nandurbar News: रस्ते, नाले, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा, तसेच विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच, शहरातील २२५ चौ. फुटापर्यंतच्या घरांसाठी घरपट्टी माफी देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी स्थायी समितीने सर्व संमतीने शिफारस केली आहे. .या निर्णयाच्या अमंलबजावणीसाठी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दिली. नंदुरबार नगर परिषदेने २०१० पासून पाणीपट्टी दरात कोणतीही वाढ केलेली नव्हती..Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार.मात्र, पाणीपुरवठा विभागात उत्पन्न आणि खर्चामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याने पाणीपट्टीत एक हजार ६ रूपयांवरून एक हजार २५० रूपये करण्याची शिफारस आम्ही केली आहे. नगराध्यक्षा म्हणाल्या, राजकारण हे केवळ टीका करण्यासाठी नसून निर्णय घेण्यासाठी असते. शहराचा विकास हा आपला सर्वांचा सामूहिक अजेंडा असला पाहिजे. पक्षीय मतभेद असू शकतात, पण शहरहितापेक्षा मोठे काहीही असू शकत नाही..नगरपालिकेने २२५ चौरस फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफीची शिफारस केली आहे. मात्र अशी घरे शहरात किती आहेत, याची संख्या जाहीर केलेली नाही. गरीब व गरजूंना खरेच घरपट्टी माफ करायची असेल, तर ५०० चौरस फुटांपर्यंत घरपट्टी माफ करावी, अशी आमची मागणी आहे. - हिरालाल चौधरी, विरोधी पक्षनेता, भाजप.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.