Nashik Dry Port Agrowon
ताज्या बातम्या

Dry Port Project : ड्रायपोर्टचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार

जेएनपीए-सेझ इनव्हेस्टर कॉन्क्लेव्हसाठी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी हे नाशिक येथे आले होते.

Team Agrowon

Nashik News : जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (जेएनपीए) यांच्यातर्फे निफाड साखर कारखान्याच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित ड्रायपोर्टचा (मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून, त्याच्या मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्र सरकारला (Central Government) पाठवला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर अठरा महिन्यांमध्ये नाशिक येथील प्रकल्प प्रत्यक्षात सुरू होईल, अशी माहिती ‘जेएनपीए’चे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली.

जेएनपीए-सेझ इनव्हेस्टर कॉन्क्लेव्हसाठी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी हे नाशिक येथे आले होते. या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत नाशिकच्या प्रस्तावित मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कबाबत माहिती दिली.

यामुळे जवळपास आठ वर्षांपासून चर्चेच्या पातळीवर असलेला ड्रायपोर्ट प्रकल्प आता मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क पुढच्या दोन वर्षांत साकारला जाण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी ३०० कोटींची गुंतवणूक होण्याचा अंदाज सेठी यांनी व्यक्त केला.

कृषिमालाच्या निर्यातील चालना मिळणार

केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर हा प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर अठरा महिन्यांमध्ये मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारले जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे.

निफाड कारखान्याच्या १०८ एकर जागेवर उभारले जाणारे मल्टिलॉजिस्टिक पार्क हे जालना व वर्ध्यानंतरचा तिसरा प्रकल्प राहणार असून तो रेल्वे, महामार्ग व कार्गोसेवेने जोडला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून फळे, भाजीपाल्यासह इतर कृषिमालाच्या निर्यातीला चालना मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT