Kolambi Project
Kolambi ProjectAgrowon

Kolambi Project : कोळंबी प्रकल्प शेतीच्या मुळावर

आगर ग्रामपंचायत क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या खाजण जमिनीत खाजगी कोळंबी प्रकल्पाला शेकडो एकर जमीन शासनातर्फे देण्यात आली आहे.
Published on

Palghar News : डहाणूपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आगर ग्रामपंचायत क्षेत्रानजीक कोळंबी प्रकल्पामुळे (Kolambi Project) भातशेतीमध्ये (paddy Farming) खारे पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेकडो एकर जमीन नापीक (Barren) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रशासनाने कोळंबी प्रकल्पांना मंजुरी देताना परिसरातील भातशेती नापीक होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी भंडारी समाजातील सामाजिक कार्यकर्ते भगवान कडू यांनी केली आहे.

Kolambi Project
Kholsapada Dam : खोलसापाडा धरणासाठी लगबग

आगर ग्रामपंचायत क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या खाजण जमिनीत खाजगी कोळंबी प्रकल्पाला शेकडो एकर जमीन शासनातर्फे देण्यात आली आहे.

या कोळंबी प्रकल्पामुळे समुद्राच्या भरतीच्या खाऱ्या पाण्याचा पसारा परिसरात असलेल्या शेतजमिनीत वाढणार असल्यामुळे या भागातील शेतीमध्ये पावसाळी भातशेती करणे शेतकऱ्यांना कठीण होणार आहे.

या भागात सर्व्हे नंबर १४० मध्ये अनेक आदिवासी व भंडारी समाजातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची भातशेती जमीन असून पूर्वपरंपार पावसाळी भातशेती केली जात आहे;

मात्र खाजण जमिनीत कोळंबी प्रकल्पाला मान्यता देण्यात येत असल्यामुळे शेतजमिनी नापीक होत आहेत.

Kolambi Project
Ujani Dam : उजनीच्या पाणीपातळीत घट, पाणीसाठा आला ७५ टक्क्यांवर
महसूल खात्याकडून कोळंबी प्रकल्पासाठी कोणालाही जमीन देण्यात आलेली नाही. चंद्रसागर पूर्वेकडील जमीन ही खासगी मालकाची असून अनेक वर्षे पडीक होती. आपल्या मालकीच्या जमिनीला समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून सुरक्षित करण्यासाठी मालकाने नगरपालिका व खार भूमी विभागाचे अभिप्राय घेऊन बांधबंधिस्ती केली आहे. तसेच या बांधबंधिस्तीमुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची महसूल खात्याकडून दखल घेतली जाईल
अभिजित देशमुख, तहसीलदार, डहाणू तालुका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com