Desi Mango Agrowon
ताज्या बातम्या

Desi Mango : गावरान आंबा होतोय दुर्मिळ

प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर लागवड केलेली तर काही नैसर्गिक उगवण झालेली गावरान आंब्याची शंभर- पन्नास झाडे ताठ मानेने उभी होती.

Team Agrowon

Latur News :आजी-आजोबांनी लागवड (Mango Cultivation) केलेले व नैसर्गिक उगवण झालेल्या शेतातील गावरान आंबे (Desi Mango) मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने आमराया नष्ट होऊन गावरान आमरसाची चव दुर्मिळ झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.

पूर्वी ‘दादा लगाए आम और खाये पोता’ या म्हणी प्रमाणे प्रत्येक गावागावात आमराया अस्तित्वात होत्या. प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर लागवड केलेली तर काही नैसर्गिक उगवण झालेली गावरान आंब्याची शंभर- पन्नास झाडे ताठ मानेने उभी होती.

मात्र, अलीकडील काळात काही झाडे जुनी होऊन वाळून जात आहेत तर नवीन संकरित, कलमीकरण केलेली विविध जातींच्या आंब्याच्या झाडाची लागवड केली जात आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात आता गावरान आंबे दुर्मिळ झाले. क्वचितच एखाद्या ठिकाणी गावरान आंब्याची झाडे दृष्टीस पडत असल्याचे चित्र आहे.

शेंद्र्या, शेप्या, गोटी, दश्या, आदी नावाने ओळखली जाणारी गावरान आंब्याची झाडे व आमराया दुर्मिळ होत आहेत. पूर्वी खेड्यात एकमेकांच्या घरी आंबे देण्याची पद्धत होती. खेड्यातही ती अलीकडे राहिलेली दिसत नाही.

फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावरान आंब्याला आता उतरती कळा लागली असून पूर्वी घराघरांमध्ये गावरान आंबे पिकविण्यासाठी लगबग असायची.

घरात प्रवेश करण्यापूर्वीच पिकविण्यासाठी टाकलेल्या गावरान आंब्याच्या आढ्यांचा सुगंध जिभेस पाणी आणत असे. पाहुणे आल्यावर त्यांच्यासमोर बादलीभर पाणी व टोपलेभर आंबे ठेवले जात.

आमरस अन् पोळी हा विशेष पाहुण्यांचा पाहूणचाराचा खास मेनू असायचा. मात्र, हे सर्व कालबाह्य झाले. शंभर- दिडशे रुपये किलोप्रमाणे आता बाजारातून आंबे खरेदी करून पाहुण्याची हौस भागवावी लागत आहे.

आंब्यांना वातावरणाचाही फटका

गावरान आंबे दुर्मिळ झाले असून क्वचित ठिकाणी गावरान झाड कैऱ्यांनी बहरल्याचे चित्र आहे. मध्यंतरी अवकाळीचा फटका बसल्याने अनेक ठिकाणी आंबे गळून नुकसान झाले आहे.

नवीन संकरित आंबे कृत्रिम रितीने पिकवलेले खाऊन हौस भागवावी लागणार आहे. तर सर्वांना आवडणारे नैसर्गिक रितीने घरी पिकवलेले गावरान आंब्याची चव चाखायला मिळणे कठीण झाल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Food Processing : ‘उच्चशिक्षित येवलेंचा नियोजनबद्ध यशस्वी प्रक्रिया उद्योग

Land Ownership: जमीन भोगवटादार अन् मालकी हक्क

Manikrao Kokate: शह-काटशहचे बळी कोकाटे

SMART Agri Project: ‘स्मार्ट’ पाऊल पुढे पडो

Alampatti Dam: कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT