Crop insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : ‘आठ दिवसांत पीक विमा रक्कम जमा करा’

‘‘नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसांत कार्यवाही करून येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी,’’ अशा सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

Team Agrowon

औरंगाबाद : ‘‘नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या (Crop insurance) प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसांत कार्यवाही करून येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी,’’ अशा सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात कृषिमंत्री सत्तार यांनी पंतप्रधान पीक विमा योजना खरीप २०२२ मधील झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा घेतला. या वेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आदी उपस्थित होते.

सत्तार म्हणाले, ‘‘ पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर चालढकल करणाऱ्या विमा कंपन्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल. प्राप्त ५१ लाख ३१ हजार सूचनांपैकी ४६ लाख ९ हजार अर्जांचे सर्वेक्षण झाले. प्रलंबित ५ लाख २१ हजार अर्जांवर सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई रक्कम तत्काळ निश्चित करावी. विमा कंपन्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार नुकसान भरपाई द्यावीच लागेल.’’

‘उर्वरित सर्वेक्षण तातडीने करा’

‘‘मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. येथील ५ लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले. उर्वरित २१ हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण संबंधित यंत्रणेने तातडीने करावे. उस्मानाबाद जिल्ह्यातील विम्यासंदर्भात सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे विमा कंपनीने त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा करावी,’’ असेही सत्तार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT