ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : पिकांच्या नुकसानीपोटी ४२ कोटींच्या मदतीची मागणी

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. बाधक झालेल्या पिकांचे पंचनामे (Crop Damage Survey) संबंधित विभागाने पूर्ण केले असून, त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्‍ह्यात जिरायती, बागायती आणि फळ पिकांचे २१ हजार ८८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, त्यापोटी ४२ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली असल्याची माहिती कृषी विभागाने (Agriculture Department) दिली आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे हजेरी लावली. या पावसाचा वाळवा, पलूस, कडेगाव, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज या नऊ तालुक्यांतील खरीप हंगामातील पिकांसह जिरायती आणि फळबागांना फटका बसला. पावसाने उघडीप दिल्यानंतर पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्यासाठी पुढाकार घेतला. या पावसामुळे झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ४५ हजार ८६८ शेतकऱ्यांचे २१ हजार ८८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सर्व पंचनामे पूर्ण केले. पंचमाने पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. २१ हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसाठी शासनाच्या नुकसानभरपाईच्या आदेशानुसार ४२ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली आहे.

नुकसानभरपाई लवकर द्यावी

वास्तविक पाहता, पंचनामे वेळेत झाले, संबंधित विभागाने अहवाल तयार करून वरिष्ठ विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र आता नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

ऑक्टोबरमध्ये पावसामुळे झालेले

पिकांचे नुकसान दृष्टिक्षेपात

जिरायती पिके

शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर) रक्कम

२८४९४ १४२७९.६२ १९ कोटी ४२ लाख

बागायत पिके

शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर) रक्कम

११९४६ ५०७४.४९ १३ कोटी ७१ लाख

फळ पिके

शेतकरी संख्या क्षेत्र (हेक्टर) रक्कम

५४२८ २५३३.२४ ९ कोटी ११ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT