Sugar Production
Sugar Production Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Production : भारतीय साखरेला मागणी कायम

Raj Chougule

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची चणचण (Sugar shortage) कायम आहे, यामुळे दर वाढलेले आहेत. भारतीय साखरेला मागणी (Sugar Demand) असली तरी निर्यातीच्या निर्बंधामुळे कारखाने अतिरिक्त साखर निर्यात करू शकत नसल्याची स्थिती आहे.

निर्यातदार भारतीय साखरेला ४२०० ते ४३०० रुपये प्रति टन देण्यास तयार आहेत. पण निर्बंधामुळे भारतीय साखर इथून पुढे जादा प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात जाण्याची शक्यता कमी आहे.

दोन वर्षांपूर्वी ब्राझीलने साखरेचे उत्पादन कमी केले आणि इथेनॉलकडे मोर्चा वळवला. यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेची मोठी चणचण निर्माण झाली. साहजिकच साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय साखरेला जगाची पसंती मिळाली.

इतिहासात उच्चांकी निर्यात गेल्या दोन वर्षांत झाली. काही वर्षांपूर्वी निर्यातीसाठी अनुदान द्यावे लागत होते. गेल्या दोन वर्षांत ही परिस्थिती बदलली. गेल्या वर्षी तर निर्यातीवर निर्बंध नसल्याने मे महिन्यापर्यंत कारखानदारांनी हवी तेवढी निर्यात केली.

११० लाख टनांहून अधिक साखर निर्यात झाली.
मे नंतर मात्र आजतागायत केंद्र सरकार सांगेल तितकीच साखर निर्यात करावी लागत आहे. बाहेर प्रचंड मागणी असूनही निर्यातीवर निर्बंध असल्याने कारखान्यांना साखर निर्यात करणे अशक्य बनले आहे. केंद्राने मे २०२३ पर्यंत ६० लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट जानेवारीतच पूर्ण झाले आहे.

त्यानंतर मात्र नवे करार करणे अशक्य बनले आहे. स्थानिक बाजारपेठेतही मागणी कमी असल्याने जिथे मागणी आहे, तिथे साखर जात नाही आणि जिथे साखर जाते तिथे स्थानिक बाजारात फारसे दर नाही, अशी अवस्था कारखानदारांची झाली आहे.

निर्यातदार सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप ब्राझीलचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. तेथील नव्या हंगामाची साखर साधारणतः एप्रिलमध्ये जागतिक बाजारपेठेत येते.

त्यामुळे आणखी महिना तरी जागतिक बाजारपेठेत साखरेची टंचाई राहणार असल्याचे चित्र आहे.

दराचे उच्चांक कायम
लंडन आंतरराष्ट्रीय बाजारात रिफाईन साखरेचा दर गुरुवारी (ता. २३) उच्चांकी पातळीवर म्हणजे प्रति टन ६०३ डॉलरवर गेला. जागतिक बाजारात साखर उपलब्ध नसल्यानेच ही परिस्थिती तयार झाली आहे.

सध्या जागतिक बाजारपेठेत साखरेचा पुरवठा कमी असल्याने सातत्याने दर वाढत आहेत. कच्ची साखर आणि पांढरी साखरेचा दर ४५०० ते ४८०० रुपये प्रति टन आहे. आणखी दोन महिने तरी ही परिस्थिती कायम राहील अशी शक्यता आहे.
- अभिजीत घोरपडे, साखर निर्यातदार, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT