Paddy Straw Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Straw : पेंढ्यांना योग्य दर देण्याची मागणी

विक्रमगड तालुक्यात भात शेतीबरोबरच माळरानावर गवतही मोठ्या प्रमाणात उगवत असते. पेंढ्याची (पाओलीची) विक्री करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात.

टीम ॲग्रोवन

विक्रमगड : विक्रमगड तालुक्यात भात शेतीबरोबरच (Paddy Farming) माळरानावर गवतही मोठ्या प्रमाणात उगवत असते. पेंढ्याची (Paddy Straw) (पाओलीची) विक्री करून शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. पाओली या गवत विक्रीसाठी तालुक्यात नोव्हेबर अखेरीस काही भागांत सुरुवात झाली. पाओलीला व गवताला योग्य भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

तालुक्यातील केव परिसर, दादडे, उपराळे अशा विविध ठिकाणी विक्री सुरू झाली आहे. या वर्षी उशिराने नोव्हेंबर शेवटी गवत व पाओलीला खरेदी करणाऱ्या वखारी सुरू झाल्या आहेत. या वर्षी तालुक्यात गवताला ५५०० ते ६००० रुपये टन भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांत तालुक्यात गवत व पाओलीला खरेदी करणाऱ्या वखारी या २५ पेक्षा जास्त होत्या. या वर्षी मात्र त्याची संख्या कमी होऊन अंदाजे ७ ते ८ वखारी सुरू आहेत.

वखारी मालक हे गवत मुंबई, वसई, नालासोपारा, ठाणे, गोरेगाव भागातील दूध व्यवसाय करणाऱ्या तबेल्यांना विक्री करतात. या गठड्यांना योग्य भाव नसल्याने वखारी मालक मागणीनुसार वखारीत साठवणूक करून ठेवत असतात.

या वर्षीही व्यापाऱ्यांकडून पाओली केवळ ३५०० ते ४००० रुपये टनमध्ये खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीसुद्धा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी वाढती महागाई व उत्पादन खर्च बघता पाओलीला ६ हजार रुपये भाव द्यावा.
सदानंद कनोजा, शेतकरी, उघाणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Input Dealers Strike: निविष्ठा विक्रेत्यांच्या ‘बंद’चे भवितव्य आज ठरणार

Chaondi Village Development: ‘चौंडीच्या विकासातून पर्यटनाला चालना मिळेल’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Parrot Crop Damage Compensation: पोपटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई: उच्च न्यायालय

Agriculture Issues: साखर, कांदाप्रश्नी केंद्राकडे पाठपुरावा : फडणवीस

Farmer Death: यवतमाळमध्ये २५ दिवसांत १८ शेतकरी आत्महत्या

SCROLL FOR NEXT