Agriculture Irrigation  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : कोळोलीत जनाईच्या आवर्तनाची मागणी

Baramati Water Shortage : बारामती तालुक्यातील कोळोली येथे जनावरांचा चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Baramati News : बारामती तालुक्यातील कोळोली येथे जनावरांचा चारा व पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी उद्योजक प्रमोद खेत्रे व संदीप काटे यांनी केली आहे.

पाऊस लांबणीवर गेल्याने गावात आणि वाड्यावस्त्यावर पाणी टंचाई व जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहेत. पाण्याअभावी चारा पिके जळून गेली आहेत.

तर ९० टक्के ऊस जळण्याच्या मार्गावर आहेत. खरीप हंगामातील बाजरीचे पीक पाण्याअभावी हातचे गेले आहे. खरीप हंगामासाठी केलेला खर्च मोठ्या प्रमाणावर वाया गेला आहे. येत्या आठ - दहा दिवसांत पाऊस पडला तरच रब्बी हंगामातील पिके शेतकरी घेतली.

अन्यथा मोठ्या दुष्काळाचा सामाना यावर्षी करावा लागणार आहे. पाऊस नसल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांचे अतोनात हाल सुरू आहेत. शेतकऱ्यानी साठवलेला कांदा सडून जावू लागला आहे.

तसेच शेतकऱ्याचा शेतीपूरक असलेला दुग्धव्यवसाय पाण्याअभावी कोलमडू लागला आहे. त्यामुळे जनाई उपसा सिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी येथील उद्योजक प्रमोद खेत्रे व संदीप काटे यांच्यासह शेतकऱ्यांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT